पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूज्य संत श्री सेवालाल महाराज जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली.
पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिले –
"पूज्य संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना माझे कोटी-कोटी प्रणाम! त्यांनी आपले संपूर्ण जीवन गरीब आणि वंचितांच्या कल्याणासाठी समर्पित केले. सामाजिक अन्यायाविरोधात पूर्ण क्षमतेने त्यांनी निरंतर लढा दिला. समानता, सद्भावना, भक्ति आणि निःस्वार्थ सेवेच्या मूल्यांप्रति देखील महाराज जी नेहमी समर्पित होते. त्यांच्या संदेशांनी समाजातील प्रत्येक पिढीला संवेदनशील आणि करुणामय जीवन जगण्यासाठी प्रेरित केले. त्यांचे उदात्त विचार न्यायप्रिय, सौहार्दपूर्ण आणि मानवतेच्या सेवेसाठी समर्पित समाज घडवण्यासाठी नेहमीच मार्गदर्शन करत राहतील.
जय सेवालाल!”
पूज्य संत श्री सेवालाल महाराज जी की जयंती पर उन्हें मेरा शत-शत नमन! उन्होंने अपना पूरा जीवन गरीबों और वंचितों के कल्याण के लिए समर्पित कर दिया। अपनी पूरी क्षमता के साथ उन्होंने निरंतर सामाजिक अन्याय के खिलाफ लड़ाई लड़ी। समानता, सद्भावना, भक्ति और निस्वार्थ सेवा के मूल्यों के… pic.twitter.com/477ZMWmIKd
— Narendra Modi (@narendramodi) February 15, 2025


