पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भावपूर्ण अभिवादन केले आहे.
पंतप्रधान म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र उभारणीतील अतुलनीय योगदान पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील. डॉ. आंबेडकरांचे जीवन आणि आदर्श नागरिकांना न्याय्य, सर्वसमावेशक आणि प्रगत समाज घडवण्यासाठी कार्य करण्याची प्रेरणा देतात, असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी सांगितले की, डॉ. आंबेडकरांचे व्यक्तिमत्व आणि कार्य राष्ट्राच्या विकासासाठी सदैव मार्गदर्शक ठरेल. मोदी यांनी अभिवादन करत एक संस्कृत सुभाषित सामायिक केले-
अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम्।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्॥
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले;
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. राष्ट्र उभारणीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी आहेत. त्यांचे जीवन आणि कार्य न्याय्य आणि प्रगत समाज घडवण्यासाठी पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील."
Tributes to Dr. Babasaheb Ambedkar on his birth anniversary. His efforts towards nation building are deeply motivating. His life and work continue to inspire generations to build a just and progressive society. pic.twitter.com/MWHUTlpf9Y
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2026
“डॉ. बाबासाहेब अम्बेडकर का व्यक्तित्व और कृतित्व राष्ट्र निर्माण के लिए प्रेरणापुंज बना रहेगा।
अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम्।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्॥”
डॉ. बाबासाहेब अम्बेडकर का व्यक्तित्व और कृतित्व राष्ट्र निर्माण के लिए प्रेरणापुंज बना रहेगा।
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2026
अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम्।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्॥ pic.twitter.com/3DAguZY08g


