पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधानांनी शास्त्री यांची सत्यनिष्ठा, नम्रता आणि निर्णायक नेतृत्वाचे स्मरण केले.
इतिहासातील महत्त्वाच्या क्षणी भारताचे राष्ट्रीय चारित्र्य घडवण्यात शास्त्री यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. त्यांनी दिलेला 'जय जवान जय किसान' नारा आजही देशाच्या सैनिक आणि शेतकऱ्यांप्रती असलेल्या भारताच्या वचनबद्धतेचे एक दृढ प्रतीक आहे.
लाल बहादूर शास्त्री यांचे जीवन आणि नेतृत्व भारतीयांच्या पिढ्यांना एका सशक्त आणि आत्मनिर्भर राष्ट्राच्या निर्माणाच्या सामूहिक प्रयत्नात प्रेरणा देत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्स वरील संदेशात म्हटले आहे :
''श्री लाल बहादूर शास्त्री एक महान नेते होते. त्यांची सत्यनिष्ठा, विनम्रता आणि अदम्य निर्धाराने आव्हानात्मक काळात भारताला बळकट केले. उत्तम नेतृत्व, कणखरपणा आणि निर्णयाक कृती यांचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. त्यांच्या 'जय जवान जय किसान' या नाऱ्यामुळे लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली. एका सशक्त आणि आत्मनिर्भर राष्ट्राच्या निर्माणाच्या सामूहिक प्रयत्नांसाठी ते आपल्याला प्रेरणा देत राहतील.''
Shri Lal Bahadur Shastri Ji was an extraordinary statesman whose integrity, humility and determination strengthened India, including during challenging times. He personified exemplary leadership, strength and decisive action. His clarion call of ‘Jai Jawan Jai Kisan’ ignited a… pic.twitter.com/p9zaMRh3xC
— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2025


