विजय दिनानिमित्त पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 1971 च्या युद्धात भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या शूर जवानांच्या शौर्याला आणि बलिदानाला वंदन केले. त्यांचा अढळ निर्धार आणि निःस्वार्थ सेवा यांने देशाचे रक्षण केले आणि भारताच्या इतिहासात अभिमानाचा क्षण कोरला गेला, असे पंतप्रधान म्हणाले.
विजय दिवस म्हणजे या जवानांच्या अदम्य भावनेचे स्मरण करण्याचा आणि त्यांच्या शौर्याला सलाम करण्याचा दिवस आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले आणि या जवानांची वीरता भारतीयांच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असेही नमूद केले.
पंतप्रधान म्हणालेः
“विजय दिवसाच्या निमित्ताने आपण सर्व त्या शूर जवानांचे स्मरण करुया, ज्यांचे धैर्य आणि बलिदानामुळे 1971 च्या युद्धात भारताला ऐतिहासिक विजय मिळाला. त्यांचा अढळ निर्धार आणि निःस्वार्थ सेवा यांनी देशाचे रक्षण केले आणि भारताच्या इतिहासात अभिमानाच्या घटनेचा एक ठसा उमटवला. त्यांच्या शौर्याला सलाम करण्याचा आणि त्यांच्या अदम्य भावनेचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. त्यांचे शौर्य पिढ्यान्पिढ्या भारतीयांना प्रेरणा देत राहील.”
On Vijay Diwas, we remember the brave soldiers whose courage and sacrifice ensured India had a historic victory in 1971. Their steadfast resolve and selfless service protected our nation and etched a moment of pride in our history. This day stands as a salute to their valour and…
— Narendra Modi (@narendramodi) December 16, 2025


