पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हिरोज एकर’ स्मारकाला भेट देऊन, नामिबियाचे संस्थापक राष्ट्रपिता आणि पहिले राष्ट्राध्यक्ष, डॉ. सॅम नुजोमा यांना आदरांजली वाहिली.

डॉ.सॅम नुजोमा हे नामिबियाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे दूरदर्शी नेते होते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्मरण केले. स्वतंत्र नामिबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून, डॉ. नुजोमा यांनी देशाच्या जडणघडणीत प्रेरणादायी योगदान दिले. त्यांचा वारसा जगभरातील लोकांना आजही प्रेरणा देत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

डॉ.सॅम नुजोमा हे भारताचे थोर मित्र होते. 1986 मध्ये नवी दिल्ली इथे नामिबियाच्या (त्यावेळचे SWAPO) पहिल्या राजदूत कार्यालयाच्या स्थापनवेळची त्यांची सन्माननीय उपस्थितीची आठवण भारतीय नागरिक कायमच जपतील, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.



