ब्राझीलमधील रिओ दि जानेरो मध्ये  17व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मलेशियाचे पंतप्रधान महामहिम अन्वर बिन इब्राहिम यांची भेट घेतली.
 

 

ऑगस्ट 2024 मध्ये मलेशियाच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीपासून भारत आणि मलेशियामधील द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा दोन्ही नेत्यांनी घेतला. यात व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, शिक्षण, आरोग्यसेवा, पर्यटन आणि लोकांमधील संपर्क या क्षेत्रांचा समावेश होता.
 

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केल्याबद्दल पंतप्रधान इब्राहिम यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले. दोन्ही नेत्यांनी बहुपक्षीय क्षेत्र आणि प्रादेशिक सुरक्षा सहकार्यावरही चर्चा केली. 
 

पंतप्रधानांनी आसियानच्या यशस्वी नेतृत्वासाठी  मलेशियाचे अभिनंदन केले आणि आसियान-भारत मुक्त व्यापार कराराच्या पुनरावलोकनाच्या  जलद  आणि यशस्वी पूर्ततेसह  आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारीला बळकटी देण्यासाठी मलेशियाच्या सहकार्याचे स्वागत केले. 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'Inspiration For Millions': PM Modi Gifts Putin Russian Edition Of Bhagavad Gita

Media Coverage

'Inspiration For Millions': PM Modi Gifts Putin Russian Edition Of Bhagavad Gita
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमासाठी आपले विचार आणि कल्पना शेअर करा
December 05, 2025

रविवार 28 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमांत आपले विचार मांडतील. आपल्या जवळ काही नाविन्यपूर्ण विचार किंवा कल्पना असल्यास त्या थेट पंतप्रधानांशी शेअर करण्याची संधी आपल्याकडे आहे. यापैकी काहींचा समावेश पंतप्रधान आपल्या कार्यक्रमांत करू शकतात.

आपल्या सूचना खाली दिलेल्या कमेंट विभागांत लिहा.