पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने 19 नोव्हेंबर रोजी अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मिलेई,यांची भेट घेतली.

दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच द्विपक्षीय बैठक होती.अध्यक्ष मिलेई यांनी पंतप्रधानांच्या ऐतिहासिक तिसऱ्या कार्यकाळासाठी त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधानांनी अध्यक्ष मिलेई यांना पदभार स्वीकारल्याबद्दल हार्दिक शुभेच्छाही दिल्या.

 

उभय  नेत्यांनी प्रशासनाच्या विषयावर सविस्तर चर्चा केली तसेच  या क्षेत्रातील आपापले अनुभव देखील सामायिक केले.गेल्या काही वर्षांमध्ये या दोन्ही ऊर्जाशील लोकशाहींदरम्यान धोरणात्मक भागीदारी अधिक व्यापक झाल्याबद्दल  त्यांनी समाधान व्यक्त केले.उभय देशांमधील वाढते व्यापार आणि आर्थिक संबंध उल्लेखनीय असून भारत अर्जेंटिनाच्या आघाडीच्या  पाच व्यापारी भागीदारांपैकी एक म्हणून उदयाला आला आहे .

उभय देशांमधील द्विपक्षीय सहकार्य देखील वैविध्यपूर्ण असून त्यात औषध निर्मिती, संरक्षण , लिथियम सह महत्वपूर्ण खनिजे , तेल आणि वायू, नागरी अणुऊर्जा, अंतराळ, कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.अर्जेंटिनाने सध्या हाती घेतलेल्या आर्थिक सुधारणांवरही उभय नेत्यांनी आपली मते मांडली.

दोन्ही नेत्यांनी सध्याच्या अनेक आंतरराष्ट्रीय समस्यांवर  चर्चा केली आणि दोन्ही देशांच्या लोकांच्या परस्पर हितासाठी  धोरणात्मक भागीदारी आणखी विकसित करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याबाबत सहमती दर्शवली

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India remains among best-performing major economies: S&P Global

Media Coverage

India remains among best-performing major economies: S&P Global
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 19 एप्रिल 2026
April 19, 2026

Building a Stronger Bharat: Infrastructure Revolution, Economic Resilience & Inclusive Welfare Under PM Modi