पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय हवामान विभागाने आपल्या देशाला दिलेल्या अद्वितीय सेवेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. या विभागाने आज सेवेची दीडशे वर्षे पूर्ण केली.
पंतप्रधानांनी एक्स वर म्हटले आहे :
"भारतीय हवामान विभागाने आपल्या देशाला दिलेल्या अद्वितीय सेवेला आज 150 वर्षे पूर्ण होत आहेत. हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या आद्य संस्थेपासून ते हवामान संशोधन क्षेत्रात अग्रेसर होण्यात आयएमडी ने अनेकांच्या जीवनाचे रक्षण करण्यात आणि पर्यावरणाबद्दलचे आपले आकलन अधिक सखोल करण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे."
Today we mark 150 years of the India Meteorological Department’s exceptional service to our nation. From pioneering weather forecasting to advancing climate research, IMD has been instrumental in safeguarding lives and enhancing our understanding of the environment. @Indiametdept pic.twitter.com/T5oocR7DFU
— Narendra Modi (@narendramodi) January 15, 2024