पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या तामेंगलाँग जिल्ह्यातील राणी गैडिनलियू रेल्वे स्थानकावर दाखल झालेल्या पहिल्या मालगाडीची प्रशंसा केली आणि यामुळे मणिपूरची कनेक्टिव्हिटी वाढेल आणि व्यापाराला चालना मिळेल असे सांगितले.
ईशान्य प्रदेश विकास मंत्री (DoNER) जी किशन रेड्डी यांच्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधान म्हणाले;
"ईशान्य प्रदेशाचे परिवर्तन सुरूच आहे.
मणिपूरची कनेक्टिव्हिटी वाढेल आणि व्यापाराला चालना मिळेल. राज्यातील सुरेख उत्पादने संपूर्ण देशभरात पोहोचतील. "


