ऑगस्ट 2023 मध्ये युपीआय (UPI) द्वारे झालेल्या व्यवहारांनी 10 अब्जांचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
‘एनपीसीआय’च्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी समाज माध्यमांवर पोस्ट केले आहे:
“ही अपवादात्मक गोष्ट आहे! भारतातील नागरिक डिजिटल प्रगतीचा स्वीकार करत असल्याचे हे निदर्शक आहे, त्यांच्या कौशल्याला सलाम. आगामी काळातही अशीच प्रगती कायम राहो.”
This is exceptional news! It is a testament to the people of India embracing digital progress and a tribute to their skills. May this trend continue in the times to come. https://t.co/MrXpYbg5Cd
— Narendra Modi (@narendramodi) September 1, 2023


