युरिया आणि नॅनो युरिया या दोन्हींच्या वापरातून खतांचा अतिवापर टाळण्याची शेतकऱ्यांना माझी विनंती : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींसह देशभरातून विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी सहभागी झाले होते.

आंध्र प्रदेशातील 102 वर्षे जुन्या सहकारी समूहाचे सदस्य असलेल्या नंद्याला येथील सईद ख्वाजा मुइहुद्दीन यांनी पंतप्रधानांना माहिती दिली की, सध्याच्या सरकारच्या पुढाकारानंतरच नाबार्डने कृषी पायाभूत सुविधा योजनेंतर्गत साठवणीसाठी समूहाला तीन कोटी रुपयांचे कर्ज दिले. यामुळे समूहाला पाच गोदामे बांधता आली. जे शेतकरी आपले धान्य ठेवतात त्यांना इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस पावत्या मिळतात ज्यामुळे त्यांना बँकांकडून कमी व्याजावर कर्ज मिळू शकते. बहुउद्देशीय सुविधा केंद्र शेतकऱ्यांना ई-मंडई आणि ई नाम शी जोडते आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी सर्वोत्तम किंमत सुनिश्चित करते. यामुळे दलालीपासून सुटका होते, असे ते म्हणाले. त्यांच्या समूहात महिला शेतकरी आणि लहान व्यावसायिकांसह 5600 शेतकरी आहेत.

100 वर्षांहून अधिक काळ समूह चालवल्याबद्दल स्थानिक शेतकऱ्यांच्या जिद्दीला पंतप्रधानांनी सलाम केला. स्थानिक शेतकऱ्यांना सहकारी बँकांद्वारे कृषी पायाभूत सुविधा निधीची माहिती मिळाली आणि निबंधक आणि साठवण सुविधेमुळे छोट्या शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनाची सर्वोत्तम किंमत मिळेपर्यंत साठवण करता आली अशी माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. गेल्या 10 वर्षांच्या उपक्रमांमुळे त्यांच्या कार्यात खरोखरच बदल झाला आहे कारण ते किसान समृद्धी केंद्र देखील चालवत आहेत, ते सरकारद्वारे स्थापन केलेल्या शेतकरी उत्पादन संघटनांद्वारे किसान क्रेडिट कार्ड आणि मूल्यवर्धन यांसारख्या अनेक सुविधा देत असल्याचे या उद्योजकाने सांगितले.

नैसर्गिक शेतीचा जो कल आहे त्यावर चर्चा करताना पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना खतांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले कारण अनेक लोक युरियाच्या वापरामध्ये नॅनो युरियाची भर घालत आहेत. शेतकर्‍यांमध्ये सातत्याने जागृती निर्माण केली जात असून खतांच्या तर्कसंगत वापरासाठी मृदा परीक्षणही सुरू आहे तसेच शेतकर्‍यांना मृदा आरोग्य कार्ड दिले जात असल्याबद्दल पंतप्रधानांना अवगत करण्यात आले. “युरिया आणि नॅनो युरिया दोन्हीचा वापर न करता उपलब्धतेनुसार नॅनो वापरण्याची विनंती पंतप्रधानांनी केली.” पंतप्रधान म्हणाले, “जेव्हा सरकार ‘सबका साथ, सबका विकास’ या भावनेने काम करते, तेव्हा योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचते. यानंतरही कोणी वंचित राहिला तर ‘मोदींच्या गॅरंटीची गाडी’ त्याच्यापर्यंत पोहोचेल.” सरकार प्राथमिक कृषी पतसंस्था बळकट करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे आणि 2 लाख साठवण केंद्रे तयार करण्याची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Rooftop solar, KUSUM account for 40% of Indias solar capacity additions in FY27 till July: Bernstein

Media Coverage

Rooftop solar, KUSUM account for 40% of Indias solar capacity additions in FY27 till July: Bernstein
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधान 27 ऑगस्ट रोजी 'खेलो इंडिया संवाद'मध्ये तरुणांना करणार संबोधित
August 26, 2026
'खेलो इंडिया संवाद' क्रीडा, युवा नेतृत्व, नागरी जबाबदारी,स्वयंसेवा, फिटनेस आणि राष्ट्र उभारणीला एका सामायिक मंचावर आणणार
'खेलो इंडिया संवाद' अंतर्गत होणारा 'युवा संवाद' क्रीडा, ऑलिम्पिक आकांक्षा, युवा नेतृत्व, विकसित भारत आणि नशामुक्त युवा या पाच प्रमुख विषयांवर केंद्रित असेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'खेलो इंडिया संवाद'ला संबोधित करतील. भारताच्या क्रीडा प्रवासात तरुणांना सहभागी करून घेणे, त्यांच्या आकांक्षा जाणून घेणे आणि समृद्ध युवा-नेतृत्वाखालील विकसित भारतासाठी त्यांच्या विचारांचे योगदान मिळवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

'मेरा युवा भारत' (MY Bharat) द्वारे राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 उत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रत्येक जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांमधील तरुणांच्या सहभागासह देशभरात आयोजित केला जाईल. तरुणांच्या आकांक्षांना राष्ट्रीय विकासाच्या विषयपत्रिकेच्या केंद्रस्थानी ठेवून एक तंदुरुस्त, शिस्तबद्ध आणि क्रीडाप्रेमी राष्ट्र घडवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेला अनुसरून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

देशव्यापी 'खेलो इंडिया संवाद' हा क्रीडा, युवा नेतृत्व, नागरी जबाबदारी, स्वयंसेवा, तंदुरुस्ती आणि राष्ट्र उभारणीला एका सामायिक मंचावर आणेल. हा उपक्रम तरुणांना देशाच्या क्रीडा आकांक्षांशी थेट जोडण्याचे माध्यम ठरेल, तसेच त्यांच्या कल्पना आणि दृष्टिकोन हे भारतातील युवा व क्रीडा परिसंस्थेमधील सतत सुरू असलेल्या संवादाचा भाग बनतील याची निश्चिती करेल.

या राष्ट्रीय कार्यक्रमानंतर तरुण सहभागी, 'माय भारत' स्वयंसेवक, स्थानिक खेळाडू आणि लोकप्रतिनिधींचा समावेश असलेले स्थानिक संवाद आयोजित केले जातील. खेळांमध्ये रस असलेले तरुण आणि भारतातील प्रमुख खेळाडू व पदकविजेते यांच्यातील थेट संवाद हे या उपक्रमाचे एक मुख्य वैशिष्ट्य असेल.

'युवा संवाद' हे या कार्यक्रमाचे एक मध्यवर्ती वैशिष्ट्य असून यामध्ये तरुण सहभागींना त्यांच्या स्वतःच्या संकल्पना, दृष्टिकोन आणि आकांक्षा व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले जाईल. हा संवाद खालील पाच विषयांवर आधारित असेल:

  • अधिक चांगल्या सुविधा, प्रशिक्षण, क्रीडा विज्ञान आणि सर्वसमावेशक सहभागाद्वारे भारताच्या क्रीडा परिसंस्थेत सुधारणा करणे
  • वैज्ञानिक प्रतिभा शोध, पारदर्शक निवड आणि दीर्घकालीन खेळाडू विकासाद्वारे 2036 ऑलिम्पिकसाठी कलागुणांची जोपासना करणे.
  • शासन व्यवस्था मंच आणि 'माय भारत' संचालित स्वयंसेवेच्या माध्यमातून युवा नेते तयार करणे.
  • नागरी कर्तव्यभावना, भविष्याभिमुख कौशल्ये आणि संरचित स्वयंसेवेची निर्मिती करून विकसित भारतासाठी तरुणांचे सक्षमीकरण करणे;
  • अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात लढा देण्यासाठी 2 ऑगस्ट 2026 रोजी सुरु झालेल्या पंतप्रधानांच्या 100 आठवड्यांच्या देशव्यापी अभियानाअंतर्गत साप्ताहिक जनभागीदारी उपक्रमांद्वारे बळकट केलेल्या, क्रीडा आणि समवयस्क नेटवर्कचा वापर करून 'नशामुक्त युवा' चळवळीला प्रोत्साहन देणे.