पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्स्टॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन सायन यांच्याशी फलदायी संवाद साधला.
अल्स्टॉमची भारतात आधीपासूनच मजबूत उपस्थिती असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. भारताच्या विकासगाथेमध्ये कंपनीचा विश्वास तसेच ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक फॉर द वर्ल्ड’ या दिशेने केलेल्या प्रयत्नांचे नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले.
आगामी काळात उभयबाजूंनी संधी आणखी व्यापक आणि अधिक चांगल्या होणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
आपल्या युवा शक्तीला बरोबर घेवून सहकार्य केले जावे, यासाठी भारत जगाला आमंत्रित करत असल्याचे, पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
पंतप्रधानांनी एक्सवरील पोस्टमध्ये सांगितले :
“अल्स्टॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन सायन यांच्याबरोबर फलदायी संवाद साधला. अल्स्टॉमची भारतात आधीपासूनच मजबूत उपस्थिती आहे. भारताच्या विकासगाथेवरील त्यांचा विश्वास आणि ‘मेक इन इंडिया’ तसेच ‘मेक फॉर द वर्ल्ड’ या दिशेने त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. आगामी काळात या संधी आणखी व्यापक होणार आहेत.
आपल्या युवा शक्तीला बरोबर घेवून सहकार्य केले जावे, यासाठी भारत जगाला आमंत्रित करीत आहे.”
Had a productive interaction with the CEO of Alstom, Mr. Martin Sion. Alstom already has a strong presence in India. Their belief in India’s growth story and their efforts towards making in India and making for the world are commendable. And, the opportunities are going to get… pic.twitter.com/2HgwzPgWAx
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2026


