पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांची आज ऑकलंडमधील गव्हर्नमेंट हाऊस येथे भेट घेतली. गव्हर्नमेंट हाऊसवर आगमन होताच पंतप्रधान मोदींचे पारंपरिक माओरी पद्धतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्यात शांतता, आदर आणि आदरातिथ्याचे प्रतीक असणाऱ्या पारंपरिक माओरी कलांचा समावेश होता. या पारंपरिक स्वागतानंतर पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

दोन्ही पंतप्रधानांमध्ये शिष्टमंडळ पातळीवर विस्तृत द्विपक्षीय चर्चा झाली. या चर्चेत व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण व सुरक्षा, कृषी-तंत्रज्ञान, क्रीडा, शिक्षण, पर्यटन, संस्कृती आणि दोन्ही देशांतील नागरिकांमधील परस्पर संबंधांसह द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंवर चर्चा करण्यात आली. भारत आणि न्यूझीलंड संबंधांमध्ये एक नवा अध्याय सुरू करत, उभय नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांना धोरणात्मक भागीदारी स्तरावर नेण्यास सहमती दर्शवली. परस्पर हिताच्या सर्व क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यावर देखील यावेळी भर देण्यात आला. भारत आणि न्यूझीलंड मध्ये 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर मते जाणून घेतली आणि बहुपक्षीय मंचांवर सहकार्य मजबूत करण्याच्या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

चर्चेनंतर, दोन्ही पंतप्रधानांच्या उपस्थितीत संरक्षण आणि सागरी सुरक्षा, हायड्रोग्राफी, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन, दुग्धव्यवसाय, पर्यटन, सागरी वारसा, संस्कृती, अन्न तंत्रज्ञान आणि महासागर संशोधन या क्षेत्रांमधील अनेक सामंजस्य करार करण्यात आले. या बैठकीतून निष्पन्न झालेल्या निर्णयांची सविस्तर यादी येथे [लिंक] पाहता येईल. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय भागीदारीच्या पुढील वाटचालीसंदर्भातील एक 'संयुक्त निवेदन' देखील जारी केले [लिंक].

पंतप्रधान लक्सन यांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे आभार मानले आणि त्यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले.
Held extensive and fruitful talks with PM Luxon in Auckland this morning. His own visit to India last year energised our bilateral partnership and my visit today, the first by an Indian Prime Minister in 4 decades, has added further momentum to the India-New Zealand friendship.… pic.twitter.com/W8bpOfAeeE
— Narendra Modi (@narendramodi) July 11, 2026
The areas which were prominently covered in the talks with PM Luxon include trade, technology and investment linkages. We have also developed a strong framework for cooperation in agriculture, dairy and food processing. Equally important is the emphasis on healthcare and… pic.twitter.com/4iHqYUyR8R
— Narendra Modi (@narendramodi) July 11, 2026
PM Luxon and I firmly believe that the greatest strength of our relationship lies in our people-to-people ties. In that spirit, we will enhance cooperation in education, sports, culture, heritage and creative industries.
— Narendra Modi (@narendramodi) July 11, 2026


