इंडोनेशियाच्या आपल्या अधिकृत शासकीय दौऱ्याचा एक भाग म्हणून, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचे आज इंडोनेशिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष महामहीम प्रबोवो सुबियांतो यांनी इस्तना मर्डेका (राष्ट्रपती भवन) येथे उत्साहात स्वागत केले आणि त्यांना समारंभपूर्वक मानवंदना  देण्यात आली. जानेवारी 2025 मध्ये भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून अध्यक्ष प्रबोवो यांनी केलेल्या भारत दौऱ्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट होती.

 

दोन्ही नेत्यांनी निवडक उपस्थितीत आणि प्रतिनिधी-स्तरीय  अशा दोन्ही स्वरूपात अधिकृत चर्चा केली. त्यांनी व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, सागरी सहकार्य, डिजिटल आणि आर्थिक तंत्रज्ञान, ऊर्जा, आरोग्य सेवा आणि औषधनिर्माण क्षेत्र, अवकाश, महत्त्वाची खनिजे  आणि दुर्मिळ मूलद्रव्ये , संस्कृती, पर्यटन, कृषी आणि दोन्ही देशांतील जनतेमधील परस्पर संबंध यांसह सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या संपूर्ण व्याप्तीचा आढावा घेतला. भारताच्या 'ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स' (ONDC) वर आधारित 'इंडोनेशिया ओपन नेटवर्क' (ION) च्या शुभारंभाचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. वर्ष 2027 मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या इंडोनेशिया भेटीचे शताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी, पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली की दोन्ही देश हा प्रसंग संयुक्तपणे "सांस्कृतिक आणि शैक्षणिक मुत्सद्देगिरीसाठी टागोर-देवांतरा वर्ष" म्हणून साजरा करतील.

दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही आपापले दृष्टिकोन सामायिक केले. त्यांनी 'आसियान-भारत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी' अधिक बळकट करण्यावर चर्चा केली. मुक्त, खुल्या आणि नियमांवर आधारित हिंद-प्रशांत क्षेत्राप्रति त्यांनी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या संदर्भात, पंतप्रधानांनी भारताच्या 'महासागर' (MAHASAGAR) या संकल्पनेवर भर दिला. अध्यक्ष प्रबोवो यांनी वर्ष 2026 मधील भारताच्या ब्रिक्स (BRICS) अध्यक्षपदाला इंडोनेशियाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

 

या चर्चेनंतर, दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत संरक्षण, महत्त्वाची खनिजे आणि दुर्मिळ मूलद्रव्ये, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शिक्षण, निवडणूक पद्धती, दूरसंचार, कृषी, सागरी सुरक्षा, अवकाश, पोलाद पुरवठा साखळी, आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय उत्पादनांचे नियमन, आरोग्य कर्मचारी सहकार्य यांसह इतर क्षेत्रांतील सामंजस्य करार (MoUs) आणि करारांची देवाणघेवाण करण्यात आली. योग्याकार्ता येथील युनेस्को (UNESCO) जागतिक वारसा स्थळ असलेल्या 'प्रंबनन मंदिर संकुला'च्या (Prambanan Temple Complex) संवर्धन आणि जीर्णोद्धारासाठी भारताच्या पाठिंब्याबाबतच्या इरादापत्राची (Letter of Intent) देखील देवाणघेवाण झाली. देवाणघेवाण झालेल्या सामंजस्य करारांची/ अंतिम करारांची पूर्ण यादी येथे [Link] पाहता येईल.

 

यानंतर, अध्यक्ष प्रबोवो यांनी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ भोजनाचे  आयोजन केले होते. पंतप्रधानांनी अध्यक्ष प्रबोवो यांच्या उत्तम आदरातिथ्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि त्यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
New Smart Drug RK-251 Developed as Replacement for Chemotherapy

Media Coverage

New Smart Drug RK-251 Developed as Replacement for Chemotherapy
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 ऑगस्ट 2026
August 21, 2026

Ease of Living Meets Strategic Strength: How India Is Building the Future in Real Time Under the Leadership of PM Modi