पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विकासाची गती मजबूत असल्याचे आज अधोरेखित केले. पंतप्रधानांनी नमूद केले की, आर्थिक वर्ष 2025-26 मधील 7.7% आणि आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीतील 7.8% जीडीपी वाढीचा दर हा अर्थव्यवस्थेची अंगभूत ताकद, सुधारणांचे यश आणि 140 कोटी भारतीयांच्या कठोर परिश्रमाचे द्योतक आहे.
मोदी यांनी प्रतिपादन केले की, ‘जीवन सुलभता’ आणि ‘व्यवसाय सुलभता’ अधिक उत्तम बनवण्याच्या दृष्टीने सरकार कोणतीही कसर सोडणार नाही. तरुणांसाठी संधी वाढाव्यात, यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले जातील, यावर पंतप्रधानांनी भर दिला.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"भारताच्या विकासाची गती मजबूत आहे!
आर्थिक वर्ष 2025-26 मधील 7.7% आणि आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीतील 7.8% जीडीपी वाढीचा दर हा आपल्या अर्थव्यवस्थेची अंगभूत ताकद, सुधारणांचे यश आणि 140 कोटी भारतीयांच्या कठोर परिश्रमाचे द्योतक आहे.”
आम्ही ‘जीवन सुलभता’, ‘व्यवसाय सुलभता’ यांना अधिक चालना देण्यासाठी आणि आमच्या तरुणांसाठी संधी वाढवण्यात कोणतीही कसर सोडणार नाही.
India’s growth momentum remains strong!
— Narendra Modi (@narendramodi) June 5, 2026
GDP growth rate of 7.7% in FY 2025-26 and 7.8% in Q4 of FY 2025-26 reflect the inherent strength of our economy, the success of reforms and the hard work of 140 crore Indians.
We shall leave no stone unturned to further ‘Ease of Living,’…


