पंतप्रधानांनी आरोग्य क्षेत्रातील परिवर्तनाची एक झलक दाखवत निरोगी भारत घडवण्याच्या संकल्पाचा केला पुनरुच्चार

गेल्या 12 वर्षांत भारताने दर्जेदार आरोग्यसेवा अधिक परवडणारी आणि सामान्य जनतेला सहज उपलब्ध होणारी बनवण्यासाठी सरकारने निरंतर काम केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. जगातील सर्वात मोठी आरोग्यसेवा योजना, 'आयुष्मान भारत' ही सर्वात गरजू नागरिकांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करून देत असल्याचा देशाला अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले. 

प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजनेसारख्या इतर प्रयत्नांमुळे औषधे परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. हृदयातील स्टेंट आणि गुडघ्याच्या प्रत्यारोपणाच्या (नी इम्प्लांट) किमती आवाक्यात आल्यामुळे लाखो रुग्णांना दिलासा मिळाला आहे असेही त्यांनी सांगितले. 

या सोबतच, वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अधिक संस्था आणि वाढीव जागा उपलब्ध झाल्यामुळे वैद्यकीय शिक्षण लोकांसाठी अधिक सुलभ झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. आरोग्य क्षेत्रात आतापर्यंत झालेल्या प्रगतीच्या भक्कम पायावर पुढील वाटचाल करत निरोगी भारत उभारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी आरोग्य क्षेत्रातील परिवर्तनाची झलकही सामायिक केली.  

X या समाज माध्यमावरील संदेशाच्या मालिकेत पंतप्रधानांनी सांगितले:

"गेल्या 12 वर्षांपासून, भारताने दर्जेदार आरोग्यसेवा अधिक परवडणारी आणि सहज उपलब्ध करण्यासाठी काम केले आहे.

जेव्हा आपण जगातील सर्वात मोठा आरोग्यसेवा कार्यक्रम, आयुष्मान भारत, राबवणारा देश म्हणून ओळखले जातो, तेव्हा आम्हाला अभिमान वाटतो. हा कार्यक्रम सर्वात गरजू लोकांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा पुरवतो.

प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजनेसारख्या इतर प्रयत्नांमुळे औषधे परवडणारी झाली आहेत. स्टेंट आणि गुडघ्याच्या इम्प्लांटच्या किमती परवडणाऱ्या झाल्या आहेत आणि यामुळे अनेक लोकांना मदत झाली आहे.

त्याचबरोबर, वाढीव वैद्यकीय महाविद्यालय आणि जागा उपलब्ध झाल्यामुळे लोकांसाठी वैद्यकीय शिक्षण अधिक सुलभ झाले आहे.

#12YearsOfSwasthBharat “

 

एक निरोगी भारत घडवण्यासाठी आपण आतापर्यंत केलेल्या प्रगतीवर पुढे वाटचाल करत राहू.

12YearsOfSwasthBharat"

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Can we have a picture? BRICS delegates gather around PM Modi for candid photo op

Media Coverage

Can we have a picture? BRICS delegates gather around PM Modi for candid photo op
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 सप्टेंबर 2026
September 12, 2026

President Putin, Partners, and a Photograph: How PM Modi Turned BRICS Into India’s Showcase

16 Crore Domestic Flyers. ₹22 Lakh Crore Tourism. The Holiday Stayed Home.