पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआय इम्पॅक्ट समिटच्या निमित्ताने जगभरातील प्रमुख नेते, नवोन्मेषक आणि तज्ञ भारतात आल्याबद्दल अभिमानाची भावना व्यक्त केली आहे. हा कार्यक्रम म्हणजे एक ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की ही परिषद म्हणजे भारताची युवा शक्ती आणि आंतरराष्ट्रीय तांत्रिक परिदृश्यावर उदयाला येत असलेले भारताचे स्थान यांचे एक स्पष्ट प्रतिबिंब आहे.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
इंडिया ए आय समिटमध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातून लोक भारतात येत आहेत ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. यामुळे आपल्या देशातील युवकांच्या सामर्थ्याची झलक देखील दिसून येते. या संधीमुळे हे देखील सिद्ध होत आहे की आपला देश विज्ञान आणि तंत्रज्ञानात वेगाने प्रगती करत आहे आणि त्याचवेळी जागतिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.
दाने तपसि शौचं च विज्ञानं विनये नये।
विस्मयो न हि कर्तव्यो बहुरत्ना वसुन्धरा।।“
यह हमारे लिए अत्यंत गर्व की बात है कि India AI Impact Summit के लिए दुनियाभर से लोग भारत आ रहे हैं। इससे हमारे देश के युवाओं के सामर्थ्य का भी पता चलता है। यह अवसर इस बात का भी प्रमाण है कि हमारा देश विज्ञान और टेक्नोलॉजी के क्षेत्र में तेजी से प्रगति कर रहा है और वैश्विक विकास… pic.twitter.com/7gxXJEtpOz
— Narendra Modi (@narendramodi) February 16, 2026


