पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणच्या जनतेला राज्याच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

"तेलंगणातील माझ्या बंधु भगिनींना राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा.  

तेलंगणातील लोक कठोर परिश्रम आणि राष्ट्रीय प्रगतीसाठी अतुलनीय समर्पण यांचे उदाहरण आहेत.  राज्याची संस्कृती जगप्रसिद्ध आहे. मी तेलंगणातील लोकांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो."