पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार दिनानिमित्त राज्यातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी बिहारच्या समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे, भारतीय इतिहासातील महत्त्वपूर्ण योगदानाचे तसेच राज्याच्या विकासात बिहारच्या जनतेने घेतलेल्या अपार मेहनतीबद्दल गौरवोद्गार काढले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिले –
“वीरांच्या आणि महान विभूतींच्या पवित्र भूमी बिहारमधील माझ्या सर्व बंधू-भगिनींना बिहार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! भारतीय इतिहासाला समृद्ध करणाऱ्या या प्रदेशाची विकासयात्रा सध्या एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहे आणि त्यामध्ये येथील मेहनती आणि प्रतिभावान नागरिकांची मोलाची भूमिका आहे. आपल्या संस्कृती आणि परंपरेच्या केंद्रस्थानी असलेल्या या राज्याच्या सर्वांगीण विकासात आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही.”
वीरों और महान विभूतियों की पावन धरती बिहार के अपने सभी भाई-बहनों को बिहार दिवस की ढेरों शुभकामनाएं। भारतीय इतिहास को गौरवान्वित करने वाला हमारा यह प्रदेश आज अपनी विकास यात्रा के जिस महत्वपूर्ण दौर से गुजर रहा है, उसमें यहां के परिश्रमी और प्रतिभाशाली बिहारवासियों की अहम भागीदारी…
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2025


