पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार्टर्ड अकाउंटंट्स (सनदी लेखापाल) दिनानिमित्त सीए बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या आर्थिक प्रवासात सनदी लेखापालांनी नेहमीच विश्वासू भागीदार म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी नमूद केले. पारदर्शकता आणि व्यावसायिक उत्कृष्टतेच्या बळावर त्यांनी देशाची आर्थिक व्यवस्था अधिक मजबूत केली, उद्योगांना खंबीर साथ दिली, तरुण उद्योजकतेला प्रोत्साहन दिले आणि गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण केला, अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले.

'X' या सामाजिक माध्यमावरच्या पोस्ट मध्ये पंतप्रधान म्हणतात,

"संपूर्ण सीए बांधवांना चार्टर्ड अकाउंटंट्स दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! भारताच्या आर्थिक प्रगतीच्या प्रवासात ते दीर्घकाळापासून एक विश्वासू भागीदार राहिले आहेत. पारदर्शकता आणि व्यावसायिक उत्कृष्टतेप्रति असलेल्या त्यांच्या बांधिलकीमुळे आपली आर्थिक व्यवस्था बळकट होते, व्यवसायांना आधार मिळतो, उद्योजकतेला चालना मिळते आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतो. त्यांचे ज्ञान आणि कौशल्य देशाच्या आर्थिक विकासात व राष्ट्रउभारणीत मोलाचे योगदान देते. 'विकसित भारत' घडवण्याच्या दिशेने आपण पुढे पाऊल टाकत असताना, त्यांचे हेच प्रयत्न देशात उद्योग-व्यवसायांसाठी पोषक वातावरण तयार करत आहेत, ज्यामुळे सर्वांसाठीच प्रगतीच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत." 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'We'll provide AI skill training to 1 crore youth': PM Modi's big announcement on Independence Day 2026

Media Coverage

'We'll provide AI skill training to 1 crore youth': PM Modi's big announcement on Independence Day 2026
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 ऑगस्ट 2026
August 15, 2026

Azadi Ka Amrit Mahotsav Continues: PM Modi’s Independence Day Vision Unites Growth, Youth Power & National Pride