जम्मू कश्मीर मध्ये होत असलेल्या तिसऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या सर्व क्रीडापटूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

जम्मू काश्मीरच्या नायब राज्यपालांच्या कार्यालयातून जारी झालेल्या ट्विट ला प्रतिसाद देताना पंतप्रधान ट्विट द्वारे म्हणतात:

तिसऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या सर्व क्रीडापटूंना माझ्या हार्दिक शुभेच्छा. गुलमर्गच्या निसर्ग आणि नयनरम्य परिसरात या स्पर्धा होत आहेत. या स्पर्धांमुळे जम्मू काश्मीरमध्ये क्रीडा संस्कृती सुद्धा वाढीला लागेल.