स्वदेशी बनावटीच्या विशाखापट्टणम विनाशिकेचा आज नौदलाच्या ताफ्यात समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. संरक्षण क्षेत्रात आधुनिकीकरणाचे प्रयत्न जोमाने सुरूच राहतील याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.

‘संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची कास धरलेल्या भारतासाठी आजचा दिवस हा अभिमानाचा दिवस आहे. आयएनएस विशाखापट्टणमचा भारतीय नौदलाच्या ताफ्यात समावेश झाला आहे ! ही विनाशिका स्वदेशात विकसित करण्यात आली असून यामुळे आपली सुरक्षा आणखी भक्कम होणार आहे. संरक्षण क्षेत्रात आधुनिकीकरणाचे प्रयत्न जोमाने सुरूच राहतील, असे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे.
Today is a proud day for India’s quest to become Aatmanirbhar in the defence sector. INS Visakhapatnam is commissioned into Indian Navy! It is indigenously developed and will strengthen our security apparatus. Our efforts towards defence modernisation continues with full vigour. pic.twitter.com/LwVIX3ufzq
— Narendra Modi (@narendramodi) November 21, 2021


