लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. भारतीय लोकशाहीतील हा ऐतिहासिक मैलाचा दगड म्हणजे जनतेकडून मिळत असलेले उदंड आशीर्वाद आणि प्रेम यांचा परिपाक आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
आपण सर्वजणांनी मिळून विकसित, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्याचा संकल्प अधिक दृढ निश्चयाने असाच पुढे नेत राहू, अशी दृढ भावनाही मोदींनी त्यांच्या या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.
'एक्स' वर लिहिलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणतात:
"माननीय ओम बिर्ला जी, आपल्या स्नेहपूर्वक शुभेच्छांबद्दल खूप-खूप आभार. भारतीय लोकशाहीतील हा या ऐतिहासिक टप्पा म्हणजे जनता-जनार्दनाने दिलेले उदंड आशीर्वाद आणि त्यांनी दाखवलेल्या आपलेपणाचा परिणाम आहे. आपण सर्वांनी मिळून विकसित, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत निर्माण करण्याचा संकल्प आणखी दृढनिश्चयाने पुढे नेत राहू.
@ombirlakota"
आपकी स्नेहिल शुभकामनाओं के लिए बहुत-बहुत आभार माननीय ओम बिरला जी। भारतीय लोकतंत्र में यह ऐतिहासिक पड़ाव जनता-जनार्दन के अपार आशीर्वाद और अपनत्व का सुपरिणाम है। हम सभी मिलकर विकसित, आत्मनिर्भर और समृद्ध भारत के निर्माण के संकल्प को और अधिक दृढ़ता के साथ आगे बढ़ाते रहेंगे।… https://t.co/8FsCitrxYm
— Narendra Modi (@narendramodi) June 10, 2026


