राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (सीडब्ल्यूजी) 2022 मध्ये पुरुषांच्या पॅरा पॉवरलिफ्टिंग हेवीवेट स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधीरचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे;
“सीडब्ल्यूजी 2022 पॅरा-क्रीडा स्पर्धांची सुधीर कडून चांगली सुरुवात! एक प्रतिष्ठेचे सुवर्ण पदक जिंकून त्याने पुन्हा एकदा आपले समर्पण आणि दृढ निश्चय दाखवला. तो मैदानावर सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. यापुढील सर्व स्पर्धांसाठी त्याचं अभिनंदन आणि शुभेच्छा.”
A great start to the CWG 2022 para-sports medal count by Sudhir! He wins a prestigious Gold and shows yet again his dedication and determination. He has been consistently performing well on the field. Congratulations and best wishes to him for all upcoming endeavours. pic.twitter.com/6V2mXZsEma
— Narendra Modi (@narendramodi) August 5, 2022


