बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये चालण्याच्या शर्यतीत प्रतिष्ठेचे रौप्यपदक पटकाविणाऱ्या प्रियांका गोस्वामी हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“चालण्याच्या शर्यतीतील आपली राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट खेळाडू प्रियांका गोस्वामी हिने या खेळातील प्रतिष्ठेचे रौप्य पदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन. हे पदक मिळवून तिने भारतातील अनेक युवा खेळाडूंना या क्रीडाप्रकारात भाग घेण्याची प्रेरणा दिली आहे. आगामी काळात तिला यशाच्या आणखी नव्या शिखरांना गवसणी घालता येवो हीच सदिच्छा. #Cheer4India.”
Congratulations to our national race walking champion Priyanka Goswami for winning the coveted Silver medal. By this medal, she has inspired many youngsters in India to take up this sport. May she keep scaling new heights of success in the times to come. #Cheer4India pic.twitter.com/GKHPjgUEMo
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2022


