पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अँथनी अल्बानीज यांचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणून निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले.
X वरील एका पोस्टमध्ये ते म्हणतात:
"ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी निवडून आल्याबद्दल तुमच्या शानदार विजयासाठी आणि पुन्हा एकदा या पदी विराजमान होणारे @AlboMP यांचे हार्दिक अभिनंदन! तुम्हाला मिळालेला हा जबरदस्त जनादेश तुमच्या नेतृत्वावरील ऑस्ट्रेलियाच्या जनतेला असलेल्या कायमस्वरूपी विश्वासाचे प्रतीक आहे. भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान सर्वसमावेशी धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आणि आशिया-पॅसिफिकमध्ये शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी उभय देशांचा सामायिक दृष्टिकोन पुढे नेण्यासाठी मी एकत्र काम करण्यास उत्सुक आहे."
Congratulations @AlboMP on your resounding victory and re-election as Prime Minister of Australia! This emphatic mandate indicates the enduring faith of the Australian people in your leadership. I look forward to working together to further deepen the India-Australia…
— Narendra Modi (@narendramodi) May 3, 2025


