पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलंबियातल्या बुकारामांगा इथे आयोजित 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या भारतीय पथकाचे अभिनंदन केले आहे. या स्पर्धेत कनिष्क जैन, रिद्धेश अनंत बेंडाळे, ऋषित गर्ग, श्रेष्ठ सुरैया आणि स्वरित जोशी यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

विद्यार्थ्यांच्या या कामगिरीतून देशाच्या युवा शक्तीची अमर्याद क्षमता आणि विज्ञान व संशोधनाविषयीची त्यांची निष्ठा पुन्हा अधोरेखित झाली आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

गेल्या दशकात या व्यासपीठावर विविध प्रकारांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी सामाजिक माध्यम ‘एक्स’वर लिहिले:

“आपल्या तरुणांची ही अत्यंत उत्कृष्ट कामगिरी आहे.

कोलंबियातल्या बुकारामांगा इथे आयोजित 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये सुवर्णपदके जिंकलेल्या कनिष्क जैन, रिद्धेश अनंत बेंडाळे, ऋषित गर्ग, श्रेष्ठ सुरैया आणि स्वरित जोशी या भारतीय पथकाचे अभिनंदन.

त्यांची ही कामगिरी आपल्या युवा शक्तीची अमर्याद क्षमता आणि विज्ञान व संशोधनाविषयी त्यांची आवड दर्शवते. तसेच गेल्या दशकात या व्यासपीठावरच्या विविध स्पर्धांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे, ही बाबही तितकीच उल्लेखनीय आहे.”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's Economic Journey: From Licence Raj To Pragmatic Governance

Media Coverage

India's Economic Journey: From Licence Raj To Pragmatic Governance
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 27 ऑगस्ट 2026
August 27, 2026

Make in India Goes Global: Engineering Boom, Rice Triumph & EU FTA Breakthrough Under PM Modi