आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 5000 मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकणाऱ्या धावपटू पारुल चौधरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी तिच्या कामगिरीचे कौतुक केले, तिची कामगिरी खरोखरच थक्क करणारी असल्याचे सांगून भविष्यातल्या तिच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"महिलांच्या 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या पारुल चौधरीचा अभिमान वाटतो.
तिची कामगिरी खरोखरच थक्क करणारी होती. अशीच उंच भरारी घेत यशाच्या दिशेने तिची घोडदौड सुरु राहो.”
Proud of Parul Chaudhary for winning the Gold Medal in Women’s 5000m event.
— Narendra Modi (@narendramodi) October 3, 2023
Hers was a performance that was truly awe inspiring. May she keep soaring high and sprinting towards success. pic.twitter.com/hmgw1MqnaC


