पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे दिग्गज डॉ.एम.आर.श्रीनिवासन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
त्यांनी एक्स वरील पोस्टमध्ये लिहिले:
“भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे दिग्गज डॉ. एम.आर. श्रीनिवासन यांच्या निधनाने खूप दुःख झाले. ऊर्जा क्षेत्रात आपल्याला आत्मनिर्भर बनवण्यासाठी अत्यावश्यक अणु पायाभूत सुविधा विकसित करण्यात त्यांची सहाय्यकारी भूमिका मोलाची ठरली आहे. अणुऊर्जा आयोगातील त्यांचे प्रेरणादायी नेतृत्व संस्मरणीय आहे. वैज्ञानिक प्रगतीला चालना देण्यासाठी तसेच अनेक तरुण शास्त्रज्ञांना मार्गदर्शन करण्यासाठी भारत नेहमीच त्यांच्याप्रती कृतज्ञ राहील. या दुःखाच्या प्रसंगी माझ्या संवेदना त्यांचे कुटुंब आणि मित्रांसोबत आहेत. ओम शांती.”
Deeply saddened by the passing of Dr. MR Srinivasan, a stalwart of India's nuclear energy program. His instrumental role in developing critical nuclear infrastructure has been foundational to our being self-reliant in the energy sector. He is remembered for his inspiring…
— Narendra Modi (@narendramodi) May 20, 2025


