पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियातील झालेल्या दुःखद विमान अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपण रशिया आणि तिथल्या लोकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे मोदी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी ‘ एक्स’ या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
रशियातील दुःखद विमान अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे व्यथित झालो. पीडितांच्या कुटुंबियांविषयी भारताच्या गहिऱ्या संवेदना. आम्ही रशिया आणि तिथल्या लोकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.
Deeply saddened at the loss of lives in the tragic plane crash in Russia. Extend our deepest condolences to the families of the victims. We stand in solidarity with Russia and its people.
— Narendra Modi (@narendramodi) July 24, 2025


