पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून आर्थिक मदतीची घोषणा

गुजरात मधील सुरत जिल्ह्यात झालेल्या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना केली. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून प्रशासन अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत पुरवत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी या अपघातातील मृताच्या वारसाला 'पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी' (पीएमएनआरएफ) मधून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

'X' वरील पोस्ट मध्ये पंतप्रधान लिहितात,

"गुजरातच्या सुरत जिल्ह्यात झालेल्या अपघाताची बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या होवोत हीच प्रार्थना. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून प्रशासन सर्व संबधितांना सर्वतोपरी  मदत करत आहे.

प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला पीएमएनआरएफ मधून 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल, तर जखमींना 50,000 रुपये दिले जातील: PM"

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Foreign traveller calls India's Vande Bharat sleeper a “Five-Star Hotel on Rails”; and the Internet agrees

Media Coverage

Foreign traveller calls India's Vande Bharat sleeper a “Five-Star Hotel on Rails”; and the Internet agrees
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 18 जुलै 2026
July 18, 2026

From Solar Canals to Hydrogen Mobility: Hon’ble PM Modi’s Blueprint for a Sustainable & Self-Reliant India