पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून जाहीर केले सहाय्य

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात झालेल्या अपघातातल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. या अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या असून, जखमींची  प्रकृती लवकरात लवकर सुधारण्यासाठी प्रार्थना केली आहे.

 यासोबतच, पंतप्रधानांनी 'पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी'मधून मृतांच्या वारसाला  2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.

'X' या समाज माध्यमावरच्या पोस्ट मध्ये पंतप्रधान म्हणतात,

"उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुर्घटनेतील जखमींना लवकरात लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

या दुःखद घटनेत जीव गमावलेल्यांच्या वारसांना पीएमएनआरएफ  मधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल, तर जखमींना 50,000 रुपये देण्यात येतील: पंतप्रधान @narendramodi"

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
West Asia conflict: 59 India-bound vessels transited Hormuz since war

Media Coverage

West Asia conflict: 59 India-bound vessels transited Hormuz since war
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 22 जुलै 2026
July 22, 2026

From Scholarships to Homes to High-Speed Rail: Inclusive Growth Under PM Modi’s Leadership