तसेच, केरळच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत पुरवण्याचे दिले आश्वासन.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून केली मदत जाहीर.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या वायनाडमधील काही भागांमध्ये भूस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याशी संवाद साधला आणि तेथील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना  2 लाख तर  जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले;

 

 

“वायनाडच्या काही भागात झालेल्या भूस्खलनाच्या वृत्तामुळे व्यथित झालो.  ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्वांसोबत माझ्या सहवेदना आहेत आणि जखमी लवकर बरे होवोत अशी प्रार्थना करतो.  सर्व बाधितांना मदत करण्यासाठी सध्या बचावकार्य सुरू आहे.  केरळचे मुख्यमंत्री श्री @pinarayivijayan यांच्याशी बोललो आणि तेथील सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.”

पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर पोस्ट केले;

“पंतप्रधानांनी वायनाडच्या काही भागांमध्ये भूस्खलनातील  मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून  2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Teachers: The artists of education

Media Coverage

Teachers: The artists of education
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 7 सप्टेंबर 2026
September 07, 2026

Vasudhaiva Kutumbakam in Action: Tech Hub, Border Villages, Global Leadership by PM Modi