पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक-शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदींनी पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी (PMNRF) मधून मदत देखील जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
"नाशिक-शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातात जीवितहानी झाल्याबद्दल दु:ख झाले. शोकाकूल कुटुंबीयांप्रति संवेदना. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात. मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी मधून(PMNRF) प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत देण्यात येईल तर जखमींना 50,000 रुपये मदत दिली जाईल : पंतप्रधान मोदी"
Pained by the loss of lives in an accident on the Nashik-Shirdi highway. Condolences to the bereaved families. May the injured recover soon. An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000: PM Modi
— PMO India (@PMOIndia) January 13, 2023


