पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाराव्या पिढीतील वंशज श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. श्री मोदी म्हणाले की ते एक पुरोगामी आणि बहुआयामी व्यक्तिमत्व होते ज्यांनी लोकांसाठी विपुल कार्य केले.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधानांनी म्हणाले;
"छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत छत्रपती शिवाजीl राजे भोसले,यांच्या निधनामुळे दु:ख झाले आहे. ते एक पुरोगामी आणि बहुआयामी व्यक्तिमत्व होते,ज्यांनी लोकांसाठी विपुल कार्य केले. त्यांनी साताऱ्याच्या प्रगतीसाठी भरीव योगदान दिले. त्यांच्या कुटुंबियांच्या, मित्रांना आणि चाहत्यांच्या प्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. ओम शांती."
Saddened by the demise of Shrimant Chhatrapati Shivajiraje Bhosale Ji. He was a dynamic and multifaceted personality who worked extensively among the people. He made a rich contribution towards Satara’s progress. Condolences to his family, friends and admirers. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) September 14, 2022
श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या निधनाने वृत्त दु:खदायक आहे. ते सदैव कार्यरत, अष्टपैलू व्यक्तिमत्व होते, लोकसेवेबरोबरच साताऱ्याच्या विकासात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रति मी माझ्या संवेदना व्यक्त करतो.ओम शांती.
— Narendra Modi (@narendramodi) September 14, 2022


