15 व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारतीय संघाने 55 पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे अभिनंदन केले.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान लिहितात;
“अत्यंत अतुलनीय यश!
15 व्या @Asian_Shooting स्पर्धेत आपल्या नेमबाजांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन.
आपल्या खेळाडूंनी 21 सुवर्णपदकांसह एकूण 55 पदकांची कमाई तसेच 6 @Paris2024 कोटा देखील मिळवला आहे.
त्यांचे कौशल्य, निर्धार आणि अदम्य उर्जा यांचा देशाला खरोखरीच अभिमान वाटतो आहे.”
An incredible achievement!
— Narendra Modi (@narendramodi) November 2, 2023
Congratulations to our shooters for their outstanding performance at the 15th @Asian_Shooting Championship.
They bring home 55 medals, including 21 Gold, along with 6 @Paris2024 quotas as well.
Their skill, determination and relentless spirit have… pic.twitter.com/oO5uRXEPV1


