शेअर करा
 
Comments
Both India and USA are global engines of growth. Eliminating terrorism is among the topmost priorities for us: PM
We consider USA a valued partner in our flagship programmes: PM Modi
Trade, commerce and investment, technology, innovation and knowledge economy are key areas of India-US cooperation: PM
Need to tackle terrorism & uproot all forms of it: PM Modi

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

मित्रांनो,बंधू भगिनीनो आणि वृत्तप्रतिनिधी

सर्वप्रथम अगदी पहिल्या ट्विटपासून आमच्या या भेटीच्या सांगतेपर्यंतराष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी माझे जे मैत्रीपूर्ण स्वागत केलेव्हाईट हाऊस आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी यांनी जे आदरातिथ्य केलेत्याबद्दल मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी माझ्यासोबत जो वेळ घालवला त्यासाठीही मी कृतज्ञ आहे. माझा हा दौरा आणि आपल्या दोघांमध्ये आजच्या बैठकीत झालेली चर्चादोन्ही देशांच्या सहकार्याच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचे पान ठरेल यात शंका नाही. 

मित्रांनोराष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि माझ्यात आज झालेली बैठक अनेक दृष्टीने खूप महत्वाची ठरली. याची कारणे म्हणजे – 

  • ही बैठक परस्परविश्वासावर आधारलेली होती.

  • त्याचे कारण म्हणजे आमची मूल्येप्राधान्यक्रमचिंता आणि आवडीनिवडी समान आहेत.

  • कारण भारत आणि अमेरिकेदरम्यानचे परस्पर सहकार्य आणि सहभागाचे यश परिसीमेवर असतांना त्या यशावर ही बैठक आधारित होती.

  • आम्ही दोन्ही राष्ट्रे विकासाचे जागतिक इंजिन आहोत.

  • दोन्ही देशसमाजाचा चहूदिशांनी विकास आणि त्याची प्रगती हे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आणि माझे प्रमुख लक्ष्य आहे आणि पुढेही राहील.

  • कारण दहशतवादासारख्या जागतिक आव्हानांपासून आपल्या समाजाची सुरक्षा करणे ही माझी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची प्राथमिकता आहे.

  • भारत आणि अमेरिका या दोन विशाल लोकशाही राष्ट्रांच्या सहकार्यातून  सशक्तीकरण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

मित्रांनो

या दोन्ही देशांमधली राजनैतिक भागीदारी इतकी दृढ आणि व्यापक आहे की तिने मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच क्षेत्रांना स्पर्श केला आहे. आमच्या दोघांमध्ये आज झालेल्या चर्चेतराष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि मी भारत आणि अमेरिकेच्या संबंधामधल्या प्रत्येक पैलूवर विस्ताराने चर्चा केली. दोन्ही देश अशा द्विपक्षीय संबंधांसाठी वचनबद्ध आहेत जे संबध उभय देशांची भागीदारी एका नव्या उंचीवर घेऊन जातील. या संदर्भात,दोन्ही देशात उत्पादकता वाढवणेविकासरोजगार निर्मिती आणि तंत्रज्ञान याबाबत आमच्यात मजबूत सहकार्य निर्माण करणे आणि या सहकार्यातली गती पुढेही कायम ठेवणेयावर आमचा भर राहील.  

भारताच्या सामाजिक आर्थिक प्रगतीसाठी आम्ही सुरु केलेल्या पथदर्शी कार्यक्रमात आम्ही अमेरिकेला सर्वात मोठा भागीदार समजतो. मला विश्वास आहे की नवा भारत घडवण्याची माझी दृष्टी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा अमेरिकेला पुन्हा महान बनवूया  या दोन्हीमधली समान दृष्टी आमच्या परस्पर सहकार्याचे नवे आयाम निर्माण करेल. माझे असे स्पष्ट मत आहे की मजबूत आणि यशस्वी अमेरीकेतच भारताचे हित सामावलेले आहे. तसेचभारताचा विकास आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे वाढते महत्वभारताची भूमिका अमेरिकेच्या हिताची आहे. व्यापारवाणिज्य आणि गुंतवणुकीत परस्पर विकास करणे याला आमचे संयुक्त प्राधान्य असेल. या संदर्भाततंत्रज्ञानसंशोधन आणि ज्ञान आधारित अर्थव्यवस्था अशा क्षेत्रात सहकार्य वाढवणे आणि ते अधिक दृढ करणे हे आमच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक असेल. यासाठी आमच्यातली यशस्वी डिजिटल भागीदारी अधिक सुदृढ करण्यासाठी आम्ही निश्चितच पावले उचलू.   

मित्रांनो

आम्ही केवळ संधींचे सोबती नाहीतर आज दोन्ही देशांसमोर असलेल्या आणि भविष्यात येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठीही आम्ही परस्परांची साथ देत आहोतदेणार आहोत. आज झालेल्या बैठकीत आम्ही दहशतवादकट्टरतावाद आणि उग्रवादामुळे संपूर्ण जगात निर्माण झालेले गंभीर संकट आणि आव्हानांवर चर्चा केली. दहशतवादाशी लढणे आणि दहशतवाद्यांना संरक्षण देणाऱ्या जागा नष्ट करणेआमच्या सहकार्याचा एक महत्वाचा भाग असेल. दहशतवादी संघटनांशी संबंधित समान चिंता आणि धोक्यांविषयी मिळालेली गुप्त माहिती आम्ही परस्परांना देऊया संदर्भात नीती समन्वय शक्य तितका वाढवला जाईल. आम्हा दोघांमध्ये प्रादेशिक विषयांवरही सविस्तर चर्चा झाली. दहशतवादामुळे अफगाणिस्तानमध्ये वाढत असलेली अस्थिरता आमच्यासाठी समान चिंताजनक बाब आहे. अफगाणिस्तानची पुनर्बान्धणी आणि त्याच्या सुरक्षेसाठी भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. अफगाणिस्तानात शांतता आणि स्थैर्य कायम राहावे या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी आम्ही अमेरिकेशी सल्लामसलतसंवाद आणि समन्वय सतत ठेवत राहू.    

भारत-प्रशांत महासागर क्षेत्रात समृद्धीशांतता आणि स्थैर्य कायम ठेवणे हा आमच्या राजनैतिक सहकार्याचा प्रमुख उद्देश आहे. या क्षेत्रात संधीचा विस्तार आणि समोर येत असलेली आव्हाने यामुळे आमच्या परस्पर राजनैतिक हितासाठी हे सहकार्य कायमच राहणे आवश्यक ठरणार आहे. याच क्षेत्रात आम्ही अमेरिकेसोबत काम करणे पुढेही सुरूच ठेवू. सुरक्षेच्या विषयातल्या आव्हानांचा सामना करतानाआमच्यात संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात वाढलेले सहकार्य अतिशय महत्वपूर्ण आहे. याविषयीही आम्ही सविस्तर चर्चा केली. भारताच्या संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी अमेरिकेने केलेल्या मदतीविषयी मी समाधान व्यक्त करतो. याचप्रमाणे सागरी सुरक्षिततेच्या क्षेत्रातही भविष्यात परस्पर सहकार्य वाढवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांदरम्यानद्विपक्षीय संरक्षणतंत्रज्ञानव्यापार आणि उत्पादन भागीदारी वाढवणेदोघांसाठी हितकारक ठरेल. अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांसंदर्भात सामाईक हितांविषयी आम्ही चर्चा केली. या संदर्भातआंतरराष्ट्रीय संस्था आणि क्षेत्रात भारताला सदस्यत्व देण्याच्या मागणीला अमेरिकेने सातत्याने पाठींबा दिला असूनत्यासाठी मी आभार व्यक्त करतो. हे दोन्ही देशांच्या हिताचेच आहे. 

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प 

भारत आणि माझ्याविषयी तुम्ही जो स्नेह दाखवलात्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि द्विपक्षीय संबंधांसाठी तुम्ही दर्शवलेल्या वचनबद्धतेविषयी मी आपले अभिनंदन करतो. मला विश्वास आहे की आपल्या नेतृत्वाखाली आपली ही मैत्री आणि राजनैतिक भागीदारी अधिकाधिक मजबूतसकारात्मक होऊन एका नव्या उंचीवर पोहोचेल.

उद्योग जगतातल्या यशस्वी कारकीर्दीचा तुमचा अनुभवआपल्या सहकार्याला अधिकच गतिमान आणि पुरोगामी दिशा देईल. भारत- अमेरिकेच्या या दौऱ्यातअमेरिकेला एक उत्तम नेतृत्व दिल्याबाद्द्ल मी आपले अभिनंदन करतो. दोन्ही देशांच्या संयुक्त विकासाच्या या प्रवासात मी सदैव आपल्यासोबत असेन ,अशी तुम्हाला खात्री देतो.

मान्यवर

आजचा माझा दौरा आणि आपल्यासोबत झालेली चर्चा अतिशय यशस्वी ठरली. हे व्यासपीठ सोडण्यापूर्वी मी आपल्याला सहकुटुंब भारत भेटीचे आमंत्रण देतो. मला आशा आहे की आपण मला भारतात आपले स्वागत-सत्कार करण्याची संधी द्याल. आपण इथे जो माझा आदर-सत्कार केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी यांचे आभार मानतो. 

धन्यवाद !!

सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Mann KI Baat Quiz
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
World's tallest bridge in Manipur by Indian Railways – All things to know

Media Coverage

World's tallest bridge in Manipur by Indian Railways – All things to know
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM expresses gratitude to the people of Kongthong for special tune in his honour for promoting village tourism
November 28, 2021
शेअर करा
 
Comments

The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed gratitude to the people of Kongthong for a special tune in his honour and in appreciation of Government of India’s efforts in promoting the village as a prime tourism destination.

In reply to a tweet by the Chief Minister of Meghalaya, the Prime Minister said;

"Grateful to the people of Kongthong for this kind gesture. The Government of India is fully committed to boosting the tourism potential of Meghalaya. And yes, have also been seen great pictures of the recent Cherry Blossom Festival in the state. Looks beautiful."