पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपमधील ‘न्यूट्री गार्डन प्रकल्पाचे कौतुक केले आहे. मोदी म्हणाले की लक्षद्वीपमधील लोक नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि त्याचा अंगीकार करण्यासाठी किती उत्साही आहेत, हे, या उपक्रमामुळे दिसून येते.

स्वावलंबी भारताच्या विकासाची उद्दिष्ट्ये साध्य करण्याचा एक भाग म्हणून हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून यात 1000 शेतकऱ्यांना भाजीपाल्याची बियाणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

त्याशिवाय, घरगुती कुक्कुटपालन योजनेअंतर्गत लक्षद्वीप मधील 600 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना देशी जातीच्या 7000 कोंबड्यांचे वाटप करण्यात आले.

लक्षद्वीपच्या राज्यपालांच्या ट्विटच्या मालिकेला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले की:

“प्रशंसनीय प्रयत्न, उत्कृष्ट परिणाम!  नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि अंगिकारण्यासाठी लक्षद्वीपमधील लोक किती उत्साही आहेत, हे या उपक्रमातून दिसून येते.”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Mapping the subsurface: How ICAR’s ‘Soil Intelligence’ is reshaping India’s mega infrastructure boom

Media Coverage

Mapping the subsurface: How ICAR’s ‘Soil Intelligence’ is reshaping India’s mega infrastructure boom
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
September 11, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे.

पंतप्रधान म्हणाले की, आचार्य विनोबा भावे यांची जय जगत ही प्रेरणादायी हाक सर्व सीमांच्या पलीकडे जाणारी होती आणि तिने मानवतेला सर्वोच्च स्थान दिले.

मोदी म्हणाले की, आपल्या विविध प्रयत्नांतून आचार्य विनोबा भावे यांनी सर्वांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी कार्य केले.

पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, समानता, प्रतिष्ठा आणि सेवा यांवरील त्यांच्या अढळ श्रद्धेमुळे समाजातील सर्वात वंचित घटकांना बळ मिळाले.

मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे;

"आचार्य विनोबा भावे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली.

त्यांची जय जगत ही प्रेरणादायी हाक सर्व सीमांच्या पलीकडे जाणारी होती आणि तिने मानवतेला सर्वोच्च स्थान दिले.

आपल्या विविध प्रयत्नांतून त्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी कार्य केले.

समानता, प्रतिष्ठा आणि सेवा यांवरील त्यांच्या अढळ श्रद्धेमुळे समाजातील सर्वात वंचित घटकांना बळ मिळाले.