संविधान दिनानिमित्त पॅरिसमधील युनेस्को मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत अभिमानाची भावना व्यक्त केली  आहे.

ही ऐतिहासिक घटना म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आणि भारताच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाला वाहिलेली यथोचित आदरांजली असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. डॉ आंबेडकर यांचे विचार आणि आदर्श जगभरातील असंख्य लोकांना सामर्थ्य आणि आशा देत राहतील असे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमांवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे :

"पॅरिस येथे युनेस्कोच्या मुख्यालयात आज संविधान दिनाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण  करण्यात आले ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आणि भारताच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाला वाहिलेली ही यथोचित आदरांजली आहे.  त्यांचे विचार आणि आदर्श जगभरातील असंख्य लोकांना सामर्थ्य आणि आशा देत राहतील. "

@UNESCO

@IndiaatUNESCO”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s maternal mortality drops nearly 80% since 1990: Global study

Media Coverage

India’s maternal mortality drops nearly 80% since 1990: Global study
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 29 मार्च 2026
March 29, 2026

Citizens Praise PM Modi for The Visionary Shift: Empowering Every Citizen in an Uncertain World