पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टोकियो येथे झालेल्या 25 व्या उन्हाळी डेफलिंपिक्स 2025 मधील असामान्य कामगिरीबद्दल भारतीय डेफलिंपियन्सचे हार्दिक अभिनंदन केले.
या स्पर्धेत 9 सुवर्णपदकांसह एकूण 20 पदकांच्या ऐतिहासिक सर्वोत्तम कामगिरीसह आपल्या खेळाडूंनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, दृढनिश्चय आणि समर्पणामुळे उत्कृष्ट यश मिळू शकते.
पंतप्रधानांनी प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे त्यांच्या अथक प्रयत्न आणि वचनबद्धतेबद्दल कौतुक केले. ते म्हणाले की, जागतिक स्तरावर भारताचा गौरव वाढविणा-या या क्रीडापटूंच्या कामगिरीबद्दल संपूर्ण देशाला अभिमान आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यम ‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये लिहिले:
"टोकियो येथे झालेल्या 25 व्या उन्हाळी डेफलिंपिक्स 2025 मधील असामान्य कामगिरीबद्दल भारतीय डेफलिंपियन्सचे हार्दिक अभिनंदन. 9 सुवर्णपदकांसह एकूण 20 पदकांच्या ऐतिहासिक सर्वोत्तम कामगिरीसह आपल्या खेळाडूंनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की दृढनिश्चय आणि समर्पणामुळे उत्कृष्ट यश मिळू शकते. प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन. संपूर्ण देशाला तुम्हा सर्वांचा अभिमान वाटतो !"
Heartiest congratulations to our Deaflympians for their extraordinary performance at the 25th Summer Deaflympics 2025 in Tokyo. With a historic best-ever medal tally of 20 medals including 9 Golds, our athletes have once again proven that determination and dedication can lead to… pic.twitter.com/J6O7iNC4ps
— Narendra Modi (@narendramodi) November 27, 2025


