पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँडचे ज्येष्ठ नेते इमकॉन्ग एल इमचेन यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, नागालँडच्या विकासात इमचेन यांनी दिलेले उल्लेखनीय योगदान कायम स्मरणात राहील. ते अनेक वर्षे सार्वजनिक जीवनात सक्रिय होते आणि आदिवासी समुदायांच्या कल्याणाप्रति ते वचनबद्ध होते. त्यांचा विधिमंडळातील आणि मंत्रिपदाचा कार्यकाळ त्यांचा प्रभाव आणि समर्पणासाठी आदरपूर्वक स्मरणात ठेवला जाईल.
एक्स वरील एका पोस्टमध्ये मोदी म्हणाले:
“इमकॉन्ग एल. इमचेन जी हे नागालँडच्या विकासात त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल कायम स्मरणात राहतील. ते अनेक वर्षांपासून सार्वजनिक जीवनात सक्रिय होते आणि आदिवासी समुदायांच्या कल्याणाप्रति विशेष जागरूक होते. त्यांचा विधिमंडळातील आणि मंत्रिपदाचा कार्यकाळ त्यांच्या प्रभाव आणि समर्पणासाठी आदरपूर्वक स्मरणात ठेवला जाईल. नागालँडमध्ये भाजपला बळकटी देण्यातही त्यांनी योगदान दिले. या दुःखद क्षणी त्यांच्या कुटुंबाच्या आणि समर्थकांच्या दुःखात सहभागी आहे.”
Shri Imkong L. Imchen Ji will be remembered for his outstanding contribution to Nagaland's development. He had been active in public life for several years and was particularly passionate about welfare of tribal communities. His legislative and ministerial tenures will be fondly…
— Narendra Modi (@narendramodi) November 12, 2025


