The person at Railway Station was Narendra Modi, The person in the Royal Palace in London is the 'Sevak' of 125 crore Indians: PM #BharatKiBaat
India is increasingly getting aspirational; days of incremental change are over: PM Modi #BharatKiBaat
When policies are clearly laid out and intentions are fair then with the existing system one can get desired results: PM Modi #BharatKiBaat
Mahatma Gandhi turned the struggle for independence into a mass movement. In the same way, development should now become a 'Jan Andolan': PM #BharatKiBaat
Democracy is not any contract or agreement, it is about participative governance: PM Modi #BharatKiBaat
Through surgical strike, our Jawans gave befitting reply to those who export terror: PM Modi #BharatKiBaat
We believe in peace. But we will not tolerate those who like to export terror. We will give back strong answers and in the language they understand. Terrorism will never be accepted: PM #BharatKiBaat
I am like any common citizen. And, I also have drawbacks like normal people do: PM Modi #BharatKiBaat
Hard work, honesty and the affection of 125 crore Indians are my assets: PM Narendra Modi #BharatKiBaat
We have a million problems but we also have a billion people to solve them: PM Modi #BharatKiBaat
Bhagwaan Basaweshwar remains an inspiration for us even today. He spent his entire life in uniting the society: PM #BharatKiBaat
We have left no stone unturned to bring about a positive change in the country: PM Modi #BharatKiBaat
We are ensuring farmer welfare. We want to double their incomes by 2022: PM Modi #BharatKiBaat
The 125 crore Indians are my family: Prime Minister Narendra Modi #BharatKiBaat
We live in a technology driven society today. In the era of artificial intelligence, we cannot refrain from embracing technology: PM Modi #BharatKiBaat
“Bharat Aankh Jhukaakar Ya Aankh Uthaakar Nahi Balki Aankh Milaakar Baat Karne Mein Vishwaas Karta Hai”: PM Narendra Modi #BharatKiBaat
Constructive criticism strengthens democracy: PM Modi #BharatKiBaat
Always remember our country, not Modi... I have no aim to be in history books: PM #BharatKiBaat

प्रसून जोशी – नमस्कार मोदी जी.

पंतप्रधान – नमस्ते. आपल्याला आणि सर्व देशवासियांना माझा नमस्कार.

प्रसून जोशी – मोदीजी, आपले अनेक कार्यक्रम आहेत आणि त्यामध्ये आपण खूपच व्यस्त आहात, हे आम्हां सगळ्यांनाच माहीत आहे. आणि असे असतानाही आम्ही आपला थोडा वेळ ‘चोरून’ घेतला आहे. म्हणून सर्वात प्रथम, आपण वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार मानतो. काही दिवसांपूर्वीच मी भारताविषयी लिहिलं होतं.

‘‘धरती के अंतस:  में जो गहरा उतरेगा, उसी के नयनों में जीवन का राग दिखेगा

धरती के अंतस:  में जो गहरा उतरेगा, उसी के नयनों में जीवन का राग दिखेगा

जिन पैरों में मिट्टी होगी,  धूल सजेगी,  उन्‍हीं के संग- संग इक दिन सारा विश्‍व चलेगा।‘‘

‘रेल्वे स्थानका’वरून आपल्या प्रवासाला प्रारंभ होतो आणि आज ‘रॉयल पॅलेस’मध्ये आपण विशेष अतिथी बनून आले आहात. या सगळ्या प्रवासाकडे मोदीजी, आपण कसे पाहता?

पंतप्रधान – प्रसून जी, सर्वात प्रथम तर मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. इतक्या प्रचंड संख्येने आलेल्या लोकांचे  दर्शन करण्याचे भाग्य आज मला मिळाले आहे. आणि आपण या चर्चेचा प्रारंभच धरणीमातेच्या धुळीकणापासून केली आहे. आपण तर कविराज आहात. ‘रेल्वे’पासून ते ‘रॉयल पॅलेस‘पर्यंत यमक जुळवून काव्य करणे आपल्या दृष्टीने खूपच सोपे काम आहे. परंतु आयुष्याचा मार्ग खूप कठिण, अवघड, खडतर असतो. रेल्वे स्थानकाची गोष्ट करायची झाली तर, ती माझी, स्वतःची व्यक्तिगत जीवनाची गोष्ट आहे. माझ्या आयुष्यातल्या संघर्षमय काळातले ती एक स्वर्णिम पान आहे. त्या काळाने मला जगायला शिकवलं. संघर्ष करायला शिकवलं. आणि इतकंच नाही तर जगणं हे केवळ आपल्यासाठी नाही, तर इतरांसाठीही असू शकतं. ही गोष्ट मी रूळांवरून धावत असलेल्या रेल्वेकडून आणि तिच्या आवाजाकडून लहानपणी शिकलो, समजलो, ती गोष्ट माझी आहे. परंतु हा ‘राॅयल पॅलेस‘, हा काही नरेंद्र मोदींचा नाही. ही गोष्ट माझी नाही….

प्रसून जी – आणि जी आपल्या मनात भावना…..

पंतप्रधान – हा ‘रॉयल पॅलेस‘ आहे तो, सव्वाशे कोटी हिंदुस्तानींच्या संकल्पाचा परिणाम आहे. रेल रूळांच्या आवाजातून शिकणारा मोदी, हा नरेंद्र मोदी आहे. ‘रॉयल पॅलेस‘मध्ये आलेला हा सव्वाशे कोटी हिंदुस्तानींचा एक सेवक आहे, तो नरेंद्र मोदी हा नाही. आणि हीच भारताच्या लोकशाहीची ताकद आहे. भारताच्या घटनेचे सामर्थ्‍य  आहे. लोकशाहीमध्ये जर जनता-जनार्दन म्हणजे ईश्वराचे स्वरूप आहे. जनतेने निर्णय घेतला तर एक चहावालासुद्धा त्यांचा प्रतिनिधी बनून ‘रॉयल पॅलेस’ मध्ये हस्तांदोलन करू शकतो. हे सामथ्र्य लोकशाहीचे आहे.

प्रसून जी – ही जी व्यक्ती आणि नरेंद्र मोदी आहेत, जे पंतप्रधान आहेत, या देशाचे प्रतिनिधित्व करतात, तिथे दोघेही एकरूप होतात. अशा स्थानी आपण आहात, किंवा आपण जो प्रवास केला आहे, तो आता एकरस झाला आहे, सगळं एकत्र झालं आहे. आणि आता एकच व्यक्ती राहिली आहे का?

पंतप्रधान – असं आहे की, मी तिथं वेगळा असतंच नाही. आणि मी आदिशंकर यांच्या अव्दैताचा सिद्धांत जाणतो, जगतो. काही काळापूर्वी मी त्यांच्यांशी जोडलेला होतो. त्यामुळे मी जाणून आहे की, जिथं माणसाचं ‘मी’ पण उरत नाही, तिथं फक्त ‘तू आणि तूच’ असतो. जिथे व्दैत नाही तिथं व्दंव्दही नाही- व्दंव्द रहात नसते. आणि म्हणूनच इथे व्दैत नाही. मी माझ्यातल्या त्या नरेंद्र मोदीला वेगळं बरोबर घेवून जात असेल तर कदाचित मी देशावर अन्याय करेन. मी ज्यावेळी स्वतःला विसरून काम करतो, तेव्हाच देशाला न्याय देवू शकणार आहे. आपल्यातल्या ‘स्व’ला विसरून काम करावे लागते. स्वतः ‘खपावं‘ लागतं. असं आपण ‘स्व‘विसरून काम केले तरच ते रोपटे चांगले जोमदार वाढते. कोणतेही बीज ज्यावेळी मातीत मिसळते, तपते, खपते, त्याचवेळी त्यातून प्रचंड वृक्ष तयार होतो. आपण जे काही म्हणता आहात, त्याकडे मी थोडं वेगळ्या पद्धतीने पाहतो.

प्रसून जी – परंतु ज्यावेळी देशाची गोष्ट असते, त्यावेळी आपण त्याकडे खूप ‘फोकस‘ करून पाहता आणि आज सर्व लोक परिवर्तनाची चर्चा करीत आहेत. कोणतेही परिवर्तन प्रथम विचारांमध्ये येत असतो आणि मग त्यानुसार कृतीमध्ये उतरत असतो. यानंतर एक प्रक्रियेतून परिवर्तन घडत असते. ही गोष्ट आपल्यापेक्षा सर्वात चांगल्या पद्धतीने कोणाला ठावूक असणार? परंतु परिवर्तन होत असताना, आपल्याबरोबर आणखी एक गोष्टही घेवून येत असतो , मोदीजी- आणि ती म्हणजे, अधीरता, आतुरता, मनाची उलघाल. मला नेमकं काय म्हणायचे आहे, हे दाखवणारी एक ध्वनिचित्रफीत आपण पाहू या.

मोदीजी, आत्ताच आपण सर्वांनी पाहिले आणि ‘व्टिटर‘वर प्रशांत दीक्षितजी आहेत. त्यांनी एक प्रश्नही विचारला आहे की, कामे खूप होत आहेत. रस्ते बनवले जात आहेत, लोहमार्ग टाकले जात आहेत, अतिशय वेगाने घरकूल निर्माणाचे कार्य होत आहे. ते असं म्हणतात की, आधी आम्हाला जर दोन पावलं चालण्याची सवय होती,तर आता मोदीजींच्यामुळे आम्ही कितीतरी पट जास्त चालत आहोत. तरीही आणखी इतकी अधीरता, आतुरता का आहे… लोकांक्षा अपेक्षांकडे तुम्ही कशा दृष्टीने पाहता?

पंतप्रधान – या गोष्टीकडे मी थोड्या वेगळ्या दृष्टीने पाहतो. ज्या क्षणसी तुमच्या मनामध्ये तृप्ततेचे भाव निर्माण होतात – आता खूप झालं. जे आहे, त्यामध्येच आपण सुखा समाधानामध्ये राहू, पूरे झालं. असा विचार केला तर जीवनामध्ये त्याच्यापुढे प्रगती केली जात नाही. प्रत्येक वयामध्ये, प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक अवस्थेपमध्ये काही ना काही तरी नवीन करण्याची, नवीन मिळवण्याची उर्मी आपल्या आयुष्याला गती देणारी असते. नाहीतर मला वाटतं, की आयुष्य एका जागी थांबलं आहे. आणि जर कोणी अधीरता, आतुरता ही वाईट गोष्ट आहे, असे समजत असेल तर मला वाटतं, ती व्यक्ती वृद्ध झाली आहे. माझ्या दृष्टीने अशी अधीरता असणे हे तरूणाईचे परिचय देणारे आहे. आपण पाहिलं असेल, अनुभवलं असेल, ज्याच्या घरामध्ये सायकल आहे, त्याच्या मनात स्कूटर घेण्याची इच्छा असते. स्कूटर असेल तर त्याच्या मनात चारचाकी गाडी घरी आली तर चांगले होईल, अशी इच्छा बाळगून असतो. आणि जर अशी मनात आस, इच्छा नसेल तर उद्या समजा त्याची सायकलच गेली तर तो विचार करेल, अरे, गेली तर गेली सायकल. चला आता बसने जावूया. याला काही जीवन म्हणत नाहीत.

आणि मला आनंद होतो की, आज सव्वाशे कोटी देशवासियांच्या मनामध्ये एक उमंग, उत्साह, आशा, अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. आधीच्या एका कालखंडामध्ये  सगळे निराशेच्या जणू खोल गर्तेमध्ये बुडाले होते. इतकंच नाही तर, अशी परिस्थिती आहे, मग आता काय करणार, द्या सोडून. ही परिस्थिती तर काही बदलणार नाही. असंच सुरू राहणार, काही बदल घडणार नाही. असा  विचार केला जात होता. आणि मला आता आनंद वाटतो की, आम्ही एक वातावरण तयार केले. लोकांनाच आता आमच्यापेक्षा जास्त अपेक्षा वाटत आहेत.

आपल्यापैकी जे लोक खूप आधी भारतातून बाहेर पडले आहेत, त्यांना तर कदाचित माहितीही नसेल की, 15-20 वर्षांपूर्वी ज्यावेळी देशात दुष्काळी परिस्थिती निर्माण होत होती, त्यावेळी गावातले लोक सरकारी कार्यालयामध्ये जावून एक निवेदन सादर करीत होते. यंदाच्या वर्षी गावामध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे तर आमच्या गावा माती, चर खोदण्याची कामे जरूर सुरू करण्यात यावीत. गावामध्ये रस्त्यावर माती घालण्याचे काम आम्ही करू इच्छितो, या कामामुळे आमच्या गावात रस्ता तयार होईल, तरी दुष्काळी काम सुरू करावे. अशी मागणी गावकरी करीत होते. त्याकाळात कामासाठी, रस्त्यासाठी दुष्काळ पडण्याची अधीरतेने गावकरी करत होते. दुष्काळामुळे गावात खोदकाम सुरू होईल, रस्ते बनतील, काम मिळेल, असा विचार लोक करीत होते.

आज माझा अनुभव आहे की, मी ज्यावेळी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, त्यावेळी ज्या गावांमध्ये एकेरी मार्ग आहे, ते म्हणायचे, अरे मुख्यमंत्रीजी जर दुपदरी मार्ग बनवा की, आता दुपदरी मार्ग झालाच पाहिजे. दुपदरी मार्ग बनवून झाल्यानंतर म्हणायचे साहेब, पेवर रस्ता असलाच पाहिजे. पेवर मार्ग बनवला पाहिजे.

काही गोष्टी माझ्या अगदी बरोबर आठवणीत राहतात. गुजरातच्या अगदी एका टोकाला असलेल्या उच्छल निझर या तहसीलमधले काही वाहनचालक लोक एकदा मला भेटायला आले होते. ते म्हणत होते की, आमच्या गावामध्ये पेवर मार्ग बनवला पाहिजे. मी म्हणालो, अरे बंधुंनो, तुमच्या भागामध्ये मी कितीतरी काळ स्कूटरवरून फिरलो आहे. मी बसनेही येत होतो. अनेक वर्षे मी या जंगलांमध्ये काम केलं आहे. आणि सर्वात महत्वाचं तुमच्या गावामध्ये चांगला रस्ता तर आहेच.

यावर त्या लोकांचे म्हणणे होते की, साहेब आम्ही आता केळ्याची शेती करतो. आणि आमची केळी निर्यात होतात. या रस्त्यावरून आमचा केळे भरलेला ट्रक जातो, त्यावेळी आमची केळी दबून जातात. आमचे 20 टक्के नुकसान होते. त्यामुळे आम्हाला पेवर मार्ग हवा आहे. पेवरमुळे आमच्या केळींचे नुकसान होणार नाही. माझ्या देशातल्या प्रवासासाठी अशा प्रकारची अधीरता निर्माण होणे, ही माझ्यासाठी प्रगतीचे एक नवीन बीजारोपण आहे, असे मी मानतो. आणि म्हणूनच अधीरता, आतुरता वाटणं, निर्माण होणं ही काही वाईट गोष्ट आहे, असं मी अजिबात मानत नाही.

दुसरे उदाहरण देतो. हे तर आपल्या कुटुंबामध्येही दिसू शकते. जर एखाद्याला तीन मुलगे असतील, तर त्या तीनही अपत्यांवर आई-वडील प्रेम, माया करीत असतात. परंतु जर काही काम असेल, तर बरेचदा एकालाच सांगितलं जातं. अरे बेटा, जर हे करून दे बरं. जो काम करतो, त्यालाच सारखं काम सांगितलंही जाणार ना? जर आज संपूर्ण देश माझ्याकडून जास्त अपेक्षा ठेवत असेल, तर त्यामागे कारण आहे की, त्यांना मी काम करेन असा विश्वास आहे. आज नाही तर उद्या तरी मी त्यांचे काम करेन. या माणसाच्या एकदा का डोक्यात हा विषय घुसवला की, कधीतरी त्याच्याकडून ते काम होणारच, केल्याशिवाय मी शांत बसणारच नाही, असा विश्वास लोकांना आहे.

असं असेल तर मी मला वाटतं की, ही गोष्ट तर जास्तच चांगली आहे. देश इतक्या वेगाने काम, प्रगती करू शकेल, असा कधी देशानंही विचार केला नसेल. आपल्याला दरवर्षी किंवा ठराविक काळाने पगारवाढ मिळते, हीच आपली ‘प्रगती’ असं आधी मानलं जात होतं. आणि विशेष म्हणजे त्या अल्पशा वेतनवाढीमध्ये आनंद मानला जात होता. जावू दे, जे झालं ते झालं! असा विचार केला जात होता. परंतु आता असं नाही. आधी एका दिवसामध्ये रस्त्याचे जितके काम होत होते, त्यापेक्षा तिप्पट काम, आता तेच कामगार, तेच अधिकारी करीत आहेत. लोहमार्ग टाकण्याचे काम असो किंवा लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम असो, सौरऊर्जा प्रकल्प उभा करण्याचे काम असो अथवा शौचालय बनवण्याचे, असे काहीही काम असो, या प्रत्येक कामांचा वेग आता वाढला आहे. आणि म्हणूनच स्वाभाविक आहे, देशवासियांच्या अपेक्षा वाढल्या आहेत कारण त्यांचा आता सरकारवर विश्वास आहे.

प्रसून जी – अगदी बरोबर आहे, तुमचं. म्हणजे आता असं वाटतंय की, आधी रस्ता त्यांच्यापर्यंत जात, पोहोचत होता आणि ज्यावेळी त्यांच्यापर्यंत रस्ता पोहोचला आहे, त्यांना आता दुनियेपर्यंत पोहोचण्याची इच्छा आहे. म्हणजेच या अनेक आशा, अपेक्षा  आहेत. त्या जागृत करण्याचे काम आपण केल्याची चर्चा आपण आत्ता केली. आणि या अधीरतेलाही आपण अतिशय चांगल्या प्रकारे समजून घेतले आहे. त्याची सकारात्मक बाजू आहे, ती आपण मांडली. अधीरता हे प्रकारे प्रगतीचे, पुढे जाण्याचे द्योतक आहे, हेही आपण आम्हाला समजावून सांगितले आहे.

मोदीजी, लोकांमध्ये असलेली अधीरता ही एका बाजूला आहे. परंतु  आपणही कधी असेच अधीर होता का? ज्या सरकारी व्यवस्थेबरोबर आपण काम करता, त्यांच्याबाबतीत तुम्ही अधीर, उत्सुक होता का? कामकाज करण्याची एक विशिष्ट सरकारी पद्धत असते, त्यामुळे तुम्ही कधी निराश होता का? कोणतेही काम मोदीजींच्या हिशेबाप्रमाणे होत नाही, अपेक्षित वेगाने कामे होत नाहीत? आपल्या मनात तर अतिवेगाने कोणत्याही योजना येतात आणि त्या पूर्ण झाल्या पाहिजेत, असे तुम्हाला वाटत असते, असा आपला बुलेट टेªनचा वेग, आणि त्यांची काम करण्याची पद्धत, नेमकं काय घडतं अशावेळी?

पंतप्रधान – आपल्यामध्ये असलेल्या कवीच्या आतमध्ये एक पत्रकारही लपलेला आहे, हे मला माहीतच नव्हतं. मला असं वाटतं की, माझ्या मनामध्ये असलेली अधीरता, उत्सुकता ज्या दिवशी संपुष्टात येईल, त्यादिवशी मी या देशाच्या दृष्टीने  निरूपयोगी ठरणार आहे. म्हणूनच माझ्या आतमध्ये असलेली ही अधीरता कायम अशीच रहावी, अशी माझी इच्छा आहे. कारण सगळ्या बाबतीत असलेली उत्सुकता, अधीरताच माझी ऊर्जा आहे. तीच मला ताकद, शक्ती देतात. मला धावपळ करायला भाग पाडतात. मी रोज रात्री झोपण्यासाठी ज्यावेळी पाठ टेकतो, त्यावेळी दुस-या दिवशीचे स्वप्न उशाशी घेवून झोपतो आणि सकाळी उठतो, तोच त्या स्वप्नपूर्तीच्या कामाला लागतो.

आणि आपण निराशेविषयी प्रश्न केलात, त्याविषयी सांगतो. मला वाटतं की, ज्यावेळी आपल्याला स्वतःसाठी काही घ्यायचे, काही कमवायचे, काही विशेष बनायचे असेल तर त्याचा संबंध आशा आणि निराशेबरोबर जोडला जातो. परंतु ज्यावेळी आपण ‘ सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय‘ असा संकल्प करून कार्य करायला लागता, त्यावेळी मला वाटत की, कधीही निराश होण्याचे कारणच निर्माण होणार नाही.

काही लोकांना कधी वाटतं की, चला, जावू दे काहीही चांगलं होणार नाही, द्या सोडून. सरकार बेकार आहे. हे सगळे नियम बेकार आहेत. कायदा काही कामाचा नाही. नोकरशाही अगदीच बेकार आहे. काम करण्याची पद्धत अयोग्य, बेकार आहे. आपल्याला असे बोलणा-या लोकांचा एक समूहच भेटेल. हे लोक सातत्याने असेच सगळं काही बेकार आहे, असं म्हणत असतात. मी मात्र यापेक्षा वेगळ्या, दुस-या प्रकारचा माणूस आहे. जर एक ग्लास अर्धा भरला असेल तर त्याकडे पाहून एखादा व्यक्ती तो ग्लास अर्धा रिकामा आहे, असं म्हणू शकतो. तर अर्धा ग्लास भरलेला आहे, असंही म्हणणारा दुसरा      माणूस असू शकतो. म्हणजे एकाच्या दृष्टीने ग्लास अर्धा भरलेला, तर दुस-याच्या नजरेने ग्लास अर्धा रिकामा आहे.   मला जर कोणी विचारले तर मी म्हणेन, ग्लास अर्धा पाण्याने भरला आहे, आणि अर्धा हवेने भरला आहे.

आणि म्हणूनच आता आपणच पहा. तेच सरकार, तेच कायदे, तीच नोकरशाही, काम करण्याची पद्धतही तीच आहे. कोणताही बदल झालेला नसतानाही चार वर्षांची हिशेब मांडायचा झाला तर फरक नक्कीच जाणवण्यासारखा आहे. इतर कोणत्याही सरकारच्या कामावर टीका करण्यासाठी मी या व्यासपीठाचा उपयोग करणार नाही आणि असं मी करणंही योग्य ठरणार नाही. परंतु काही गोष्टी व्यवस्थित समजण्यासाठी तुलनात्मक अभ्यास करणे आवश्यक असते. गेल्या दहा वर्षांमध्ये ज्याप्रकारे काम होत होते, ते पाहिल्यानंतरच अलिकडच्या चार वर्षात कसे काम झाले आहे, हे समजणार, लक्षात येणार आहे. अशा तुलनात्मक अभ्यासातूनच आपल्या लक्षात येईल की, त्यावेळी निर्णय प्रक्रिया कशी होती, आजची निर्णय प्रक्रिया कशी आहे. त्यावेळी केली जाणारी कृती,कार्य कसे होते आणि आजची कृती कशी आहे. आपल्याला या दोन्हीमध्ये अगदी ‘जमीन – आसमान‘ याप्रमाणे फरक दिसून येईल. याचाच अर्थ असा आहे की, जी व्यवस्था अस्तित्वात आहे, तिच्याच माध्यमातून काम करताना जर आपल्याकडे स्पष्ट नीती असेल, आपला हेतू स्वच्छ असेल, काम करण्याचा ठाम निर्धार असेल आणि ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय‘ कार्य करण्याचा निश्चय असेल तर, याच व्यवस्थेमध्ये राहून आपण अपेक्षित, इच्छित परिणाम साध्य करू शकता.

हा विचार माझ्या मनात अगदी कायमचा घर करून बसला आहे. आपली जी जी इच्छा आहे, ती ती पूर्ण झालीच पाहिजे, किेंवा होणारच आहे, असं तर कधीच होणार नाही. हे तर नक्कीच आहे. परंतु मी त्यामुळे कधीच निराश, नाराज होत नाही. कारण, मी ते काम का झालं नाही,त्याच्यामागच्या कारणांचा शोध घेत असतो. कारणांचा विचार करत असतो. आणि भविष्यात ते काम करण्याचा मार्ग कसा मोकळा होवू शकेल, याचा छडा लावतो.  यावेळी हे काम करताना आपण या मार्गाचा अवलंब केला होता.  आता तेच काम वेगळ्या, नव्या पद्धतीने केले पाहिजे, असा विचार मी करतो आणि त्याची अंमलबजावणीही करतो.

प्रसून जी – मोदीजी, या टप्प्यावर आपल्याकडे एक प्रश्न आला आहे, त्याचे उत्तर आपण द्यावे, असं माझी इच्छा आहे. हा प्रश्न काय आहे हे, आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार     आहोत. प्रियंका वर्मा या दिल्लीमध्ये वास्तव्य करतात, त्यांनी आपल्यासाठी एक प्रश्न विचारला आहे. पाहू या –

प्रियंका – मोदीजी, मी प्रियंका, दिल्लीची आहे. मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की, आम्ही सरकार का निवडतो? तर आम्ही निवडलेल्या सरकारने आमच्यासाठी काम करावे. परंतु  ज्यावेळेपासून आपले सरकार आले आहे, त्यावेळेपासून तर सगळी कार्यपद्धतीच पूर्णपणे बदलली गेली आहे. आपण तर सरकारच्या बरोबरीने आमच्यासारख्या लोकांनाही कामाला लावले आहे. अर्थात ही एक चांगली गोष्ट आहे. परंतु माझा आपल्याला एक प्रश्न असा आहे की, असे आधी का होत नव्हते? धन्यवाद.

प्रसून जी- हा प्रश्न विचारला आहे तो असा आहे की, आपण काम करताना सरकारच्या बरोबरीने लोकांनाही जोडत आहात. यामध्ये मग स्वयंपाकाच्या गॅससाठी दिले जाणारे अनुदान असेल किंवा इतर कोणत्याही बाबतीत असेल, जनतेचाही त्यामध्ये सहभाग असावा, असे आपल्याला वाटते. आपण जनतेकडून खूप अपेक्षा ठेवता. तर ही काम करण्याची आपली पद्धत अशी वेगळी कशी का आहे?

पंतप्रधान – प्रियंकाजींनी खूप चांगला प्रश्न विचारला आहे. याचे उत्तर मी देतो. यासाठी आपण 1857 पासून ते 1947 पर्यंतचा काळ विचारामध्ये घेवू. त्याआधीच्या काळाचाही विचार करू शकतो. परंतु मी 1857 विषयी आत्ता बोलतो. 1857 मध्ये ज्यावेळी पहिला स्वतंत्रता संग्राम झाला, ते हे वर्ष. या काळातले कोणत्याही वर्षाचा विचार करा. शतकभरातले कोणतेही वर्ष विचारात घ्या. हिंदुस्तानातल्या कोणत्याही कानाकोप-यात जा. प्रत्येक ठिकाणी कोणी ना कोणी तरी या देशासाठी हौतात्म्य पत्करलेले असल्याचे दिसून येईल. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण पणाला लावून काही ना काही केलेली अनेक महान लोक आहेत. कोणा एखाद्या नवयुवकाने आपले आयुष्य तुरूंगवासामध्ये काढले आहे. मला याचा अर्थ हा सांगायचा आहे की, स्वातंत्र्याचा संघर्ष कोणत्याही काळात, देशाच्या कोणत्याही भागामध्ये थांबला नाही. सतत संघर्ष सुरूच होता. लोक येत होते, लढत होते, हौतात्म्याचे मूल्य चुकते करत होते आणि स्वातंत्र्याच्या संघर्षाची मशाल धगधगती राहत होती.

परंतु महात्मा गांधींनी काय केलं? महात्मा गांधीजींनी या संपूर्ण भावनेला एक नवीन रूप बहाल केले. त्यांनी या लढ्यामध्ये सर्वसामान्यांना जोेडले. सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला ते म्हणायचे, बाबा रे, तुला देशाला स्वतंत्र करायचे आहे ना? मग असं कर- तू हा झाडू हातात घे आणि स्वच्छतेचं काम कर. देशाला स्वातंत्र्य मिळेल. तुला स्वांतत्र हवे ना, मग तू शिक्षक म्हणून काम कर. अतिशय चांगल्या पद्धतीने मुलांना शिकव, देशाला स्वातंत्र्य मिळेल. तुम्ही प्रौढ शिक्षणाचे काम करू शकता ना, मग तेच करा. तुम्ही खादीचे काम करू शकता का, मग करा. तुम्ही नवयुवकांना एकत्रित करून प्रभातफेरी काढू शकता का, चालेल. काढा प्रभातफेरी.

महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य चळवळीला जनआंदोलनामध्ये परावर्तीत केले. जनसामान्यांना त्यांच्या क्षमतेनुसार काम दिले. तुम्ही चरखा घेवून बसा, सूतकतई करा, देशाला स्वातंत्र्य मिळेल. आणि लोकांनाही विश्वास वाटत होता की, स्वातंत्र्य असेही सगळे केल्यानंतर मिळू शकते.

मला असं वाटतं की, प्राणांची बाजी लावणारे या देशात काही कमी नव्हते. देशासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून जीवावर उदार होणा-या लोकांची संख्या कमी नव्हती. असे लोक येत होते, हौतात्म्य पत्करत होते. आणि मग पुन्हा आणखी कोणी नवीन येत होता. हुतात्मा होत होता.

गांधीजींनी एकाच वेळी हिंदुस्तानच्या प्रत्येक कानाकोप-यामध्ये कोटी -कोटी लोकांना उभं केलं त्यामुळे स्वातंत्र्य मिळणे सुकर, सोपे झाले. विकासाचेही असेच आहे. एखाद्या अभियानाचे, मोहिमेचे जनआंदोलन बनले पाहिजे, असे मला वाटते.सरकार देशाला बदलून टाकेल, सरकारच विकास करेल, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशात असे वातावरण तयार झाले की, आता देश स्वतंत्र झाला आहे, यापुढे जे काही करायचे असेल ते सरकार करेल, असा विचार सर्वजण करू लागले. अगदी गावामध्ये एखादा खड्डा आहे, किंवा गावात एखादा खड्डा पडला तरी लोक एकत्रित येतात, निवेदन तयार करतात, भाड्याने एखादी जीप घेतात आणि तहसील कार्यालयामध्ये जावून निवेदन देतात. गावकरी वर्गाची इच्छा असती तर  जीप भाड्याने घेण्याच्या खर्चात तर तो खड्डाही भरून काढता आला असता. परंतु एकच भावना, जे काही करायचे असेल ते आता सरकारलाच करू दे.

स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये असेच वातावरण तयार झाले. ही सगळी कामे कोण करणार तर, सरकार करणार. यामुळे नेमकं झालं काय तर, सरकार आणि जनता यांच्यामध्ये एक प्रकारची दरी निर्माण झाली. दोघांमध्ये अंतर पडत गेले. आपण पाहिलं असेलच, बसमधून प्रवास तर अनेकजण करतात. आपणही कधी हा अनुभव घेतला असेल. बसमध्ये एखादेवेळी प्रवासी एकटा असतो. आजूबाजूला कोणी इतर प्रवासी नसतो. त्यालाही करायला काही काम नसते. प्रवासाचा वेळ घालवायचा कसा आणि रस्ता संपत नसतो. अशावेळी तो काय करतो, आपलं बोट बसच्स सीटमध्ये घालतो, छिद्र पाडतो, वेळ घालवण्यासाठी कुरडत राहतो, त्या छिद्राचे मोठी चीर होते, हा फाडत राहतो. अर्थात हे सगळं का घडतं? तर त्याला माहीत असते, ही बस काही आपली कोणाची नाही. तर सरकारची आहे. मग बसचे सीट फाडले तर माझं कुठं नुकसान होणार आहे? असा विचार तो करतो. जनतेच्या मनामध्ये हे सरकार माझे आहे, हा देश माझा आहे, ही भावनाच लुप्त होत गेली आहे.

मला असं वाटतं की, देशामध्ये ही भावना आता जागृतच नाही तर प्रबळ झाली पाहिजे. दुसरे म्हणजे, लोकशाही. हे म्हणजे काही करारपत्र,करारनामा नाही. मी आज ठप्पा मारला, मत दिले, आता या माणसाला पाच वर्षे काम करू दे. पाच वर्षांनंतर विचारलं जाईल की, काय काम केलंस बाबा,  नाही तर दुसरी व्यक्ती आणण्यात येईल. हा काही कामगार करार नाही. हे तर भागीदारी, सहभागीतेचे काम आहे. आणि म्हणूनच मला सहभागीता असलेली लोकशाही महत्वाची वाटते. त्यावर जोर देण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटते. आणि आपण सगळ्यांनीच अनुभवले असेल की, ज्यावेळी कोणतीही नैसर्गिक आपत्ती येते, त्यावेळी सरकारपेक्षा समाजाची शक्ती चांगल्याप्रकारे एकवटली जाते आणि आम्ही त्या अतिशय कठीण प्रसंगामध्ये, निर्माण झालेल्या समस्येला उत्तर शोधतो. ते कसे काय? कारण ही एकत्रित झालेली ताकद ही जनता – जनार्दनाची ताकद असते. तिच्यामध्ये प्रचंड शक्ती असते. लोकशाहीमध्ये जनतेवर जितका जास्त विश्वास ठेवला जाईल, जनतेला जास्तीत जास्त सहभागी करून घेतले जाईल, तितके चांगले आणि लवकर परिणाम दिसून येतात.

सरकार सत्तेवर आल्यानंतर मी शौचालये बनवण्याची मोहीम सुरू केली. आपण कल्पना करू शकाल, इतक्या मोठ्या संख्येने सरकार शौचालये बनवू शकले असते का? सरकार आधी पाच हजार शौचालये बनवत असेल तर आता दहा हजार बनवू शकेल. आणि वर असं सांगितले जाईल की,‘‘ अरे, या आधीचे सरकार तर पाच हजारच बनवत होते, मोदी सरकार तर दुप्पट, दहा हजार शौचालये बनवत आहे’’. मला सांगा दहा हजारांनी काम पूर्ण होणार आहे का? जनतेने निश्चय केला आणि काम पूर्ण झाले.

आणि आता जनतेची ताकद किती असते पहा, भारतामध्ये ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेच्या तिकिटामध्ये सवलत मिळते. आमचे सरकार आल्यानंतर मी म्हणालो, की आपल्याला जो आरक्षणाचा अर्ज भरावा लागतो, त्यामध्ये असे स्पष्ट लिहा की, मी वयाने ज्येष्ठ नागरिक आहे, परंतु मला जी सवलत मिळते, ती मी घेवू इच्छित नाही. हे किती साधे होते. पंतप्रधान म्हणून काही मी हे आवाहन अजिबात केले नव्हते. आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल की, हिंदुस्तानची विशेषता काही वेगळीच आहे. हिंदुस्तानमधील सर्व सामान्य माणसाच्रूा मनामध्ये देशभक्ती खूप आहे. त्याचे दर्शन अशा वेळी होते. अलिकडेच आम्ही हा निर्णय घेतला आहे. तर आत्तापर्यंत 40 लाख ज्येष्ठ नागरिकांनी, अगदी जे लोक वातानुकुलित वर्गामधून प्रवास करतात, त्यांनी आपल्याला अशा प्रकारची सवलत दिली नाही तरी चालेल. असे लिहून दिले आहे. आणि आम्ही पूर्ण पैसे देवून तिकीट खरेदी करून प्रवास करू, असे स्पष्ट केले आहे.

आता हीच गोष्ट मी कायदा, नियम म्हणून केली. म्हणजे आता यापुढे ज्येष्ठ नागरिकांना सवलतीमध्ये रेल्वे तिकीट मिळणार नाही, त्यांना दिला जाणारा लाभ बंद करण्याचा नियम केला असता, तर काय झालं असतं? मोर्चे काढण्यात आले असते, बंद घडवून आणला असता, पुतळे जाळले असते आणि मग? मग काय लोकप्रियतेच्या क्रमवारीमध्ये मोदींचे स्थान एकदम खाली गेले असते. अशी क्रमवारी लावत असलेल्यांची दुकानदारी चांगली चालली असती. परंतु झालं काय हे आपण पाहिलंच असेल. 40 लाख लोकांनी आपल्याला सवलतीची आवश्यकता नसल्याचं लिहून दिलं आहे.

एके दिवशी मी लालकिल्ल्यावरून आवाहन केलं की, ज्या लोकांना शक्य असेल, परवडणार असेल, त्यांनी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर मिळणारे अनुदान का घ्यायचे? आपल्या देशामध्ये गॅस सिलेंडरच्या संख्येच्या आधारावर निवडणूक लढवली जात होती. कोणी म्हणायचे तुम्ही मला पंतप्रधान बनवा, आत्ता तुम्हाला 9 गॅस सिलेंडर मिळतात ना, मग मी पंतप्रधान झालो तर तुम्हाला 12 सिलेंडर देईन. मी मात्र, 2014 मध्ये लालकिल्ल्यावरून अगदी उलट आवाहन जनतेला केले. जर तुम्हाला अनुदानाची गरज नाही आहे ना, मग सोडून द्या. आपल्याला आश्चर्य वाटेल, हिंदुस्तानामधल्या जवळपास सव्वा कोटींपेक्षा जास्त कुटुंबांनी गॅस सिलेंडरवर मिळणारे अनुदान सोडून दिले आहे. आपल्या देशामध्ये प्रामाणिक लोकांची संख्या काही कमी नाही. देशासाठी मरण्यासाठी सिद्ध असणारे असंख्य आहेत. तसेच देशासाठी काही ना काही करणारांची संख्याही कमी नाही.

आम्हा लोकांचे कार्य आहे, ते म्हणजे देशाचे सामथ्र्य कशात आहे ते समजून घेणे, त्यांना जोडणे, आणि माझा प्रयत्न असतो, की आम्ही म्हणजे सरकारनेच देश चालवला पाहिजे. हा जो एकप्रकारचा अहंकार निर्माण झाला आहे ना, तो अहंकारच सरकारने सोडून दिला पाहिजे. जनता -जनार्दन हीच खरी शक्ती आहे. त्यांना बरोबर घेवून पुढे चालले पाहिजे. असे केले तर आपल्याला जसा हवा आहे, तसाच परिणाम ही जनताच आणून देणार आहे. आणि म्हणूनच मी जनतेला बरोबर घेवून, त्यांच्याशी मिळून, मिसळून, त्यांचे विचार नेमके काय आहेत, हे जाणून घेवून काम करतो आणि पुढे जातो आहे.

प्रसून जी – अरे व्वा! मोदीजी, जुन्या दोन ओळींचे स्मरण झाले आहे. सरकार आणि जनता यांच्यामध्ये जे अंतर पडले होते, त्याविषयी या ओळी आहेत-

कि हम नीची नजर करके देखत हैं चरण तुमरे,

तुम जाइके बैठे हो इक ऊंची अटरिया मां।

पंतप्रधान – मी तर जनता -जनार्दनाला एकच प्रार्थना करतो की, आपण आम्हाला आशीर्वाद द्यावा, कमीत कमी मला ती सवय लागणार नाही.

प्रसून जी – मोदीजी, अगदी बरोबर आहे. आता यानंतर आपण प्रेक्षकांमधून प्रश्न घेणार आहे. आपण, हां- हां जरूर आपण काही बोलावं.

प्रेक्षकांमधून एक प्रश्न विचारण्याची विनंती आली होती. श्री. मयूरेश ओझानी जी एक प्रश्न विचारू इच्छित आहेत. मयूरेश ओझानी जी आपला प्रश्न विचारावं. कृपया या बाजूला येवून प्रश्न विचारावा.

प्रश्नकर्ता – नमस्ते जी, मोदी जी. ज्यावेळी आपण सर्जिकल स्ट्राईक करण्याचा अतिमहत्वपूर्ण, ऐतिहासिक निर्णय आणि अतिशय धाडसी पावूल उचलण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी आपल्या मनात नेमक्या कोणत्या भावनांनी गर्दी केली होती?

प्रसून जी – सर्जिकल स्ट्राईकविषयी आपण प्रश्न केला आहे.

पंतप्रधान – मी आपला आभारी आहे. आपण आपल्या भावना बोलून व्यक्त करू शकत नव्हता,  परंतु आपण जी कृती केली त्यावरून मला बरेच काही समजले. त्याचबरोबर आपल्या सहकारीनेही तुमच्या मनातली भावना माझ्यापर्यंत पोहोचवली.  एक तर हे दृश्यच खूप हृदयाला, मनाला भिडणारे आहे. माझ्या मनालाच जणू त्याने स्पर्श केला आहे. भगवान रामचंद्रजी आणि लक्ष्मण यांचा एक संवाद आहे. लंका सोडताना असलेल्या या संवादामध्ये आपल्याला  काही सिद्धांताचे दर्शन होते. परंतु ज्यावेळी जर कोणी दहशतवाद्यांना निर्यात करण्याचा उद्योग बनवत असेल आणि माझ्या देशाच्या निरपराध नागरिकांना मृत्यूला सामोरे जावे लागत असेल, युद्ध लढण्याची ताकद नसतानाही जर कोणी पाठीमागून वार करण्याचा प्रयत्न करीत असेल तर या मोदीला, त्याच भाषेमध्ये कसे उत्तर द्यायचे असते, हे चांगलेच माहीत आहे.

आमच्या जवान रात्रीच्यावेळी तंबूमध्ये झोपले असताना, काही पळपुट्यांनी येवून त्यांना मृत्यूशी सामना घडवला. हे बरोबर आहे का? असं घडल्यानंतर आपल्यापैकी कोणीतरी गप्प बसू शकणार आहे का? त्यांना जशास तसे, चोख प्रत्युत्तर देण्याची गरज होती की नाही? आणि म्हणूनच आम्ही सर्जिकल स्ट्राईक केले. आणि मला माझ्या लष्करावर अतिशय गर्व आहे. माझ्या जवानांचा मला गर्व वाटतो. जी काही योजना बनवली होती, तिची अगदी शंभर टक्के, अगदी एक तसूभरही चूक न करता त्यांनी यशस्वीपणे अंमलबजावणी केली. आणि इतकेच नाही तर सूर्योदय होण्यापूर्वीच सगळेजण परतलेही होते. आणि आमच्या मनाचा मोठेपणाही तुम्हाला समजला पाहिजे. जे अधिकारी या संपूर्ण योजनेमध्ये सहभागी झाले होते,त्यांना मी सांगितले की, आता आपण जे काही केले आहे, ते संपूर्ण हिंदुस्तानला समजण्याआधी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी तिथं पोहोचण्यापूर्वीच, पाकिस्तानच्या लष्कराला फोन करून सांगा की, आज रात्री आम्ही हे कृत्य केले आहे, तुमच्या सैनिकांचे मृतदेह तिथे पडली असतील, जर का तुमच्याकडे वेळ असेल तर जावून घेवून या.

आम्ही सकाळी 11 वाजता त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करीत होतो. तर फोनवर येण्यासाठी, बोलण्यासाठी ते घाबरत होते. बोलायला येत नव्हते. एकीकडे मी सर्व पत्रकारांना बोलावून ठेवलं होतं. आमच्या लष्कराचे अधिकारी उभे होते. पत्रकारांना आश्चर्य वाटत होतं. नेमकं काय घडलं आहे, कोणालाच समजत नव्हतं. कोणीही बोलत नव्हतं, काही सांगत नव्हतं.

मी म्हणालो, पत्रकार बसले आहेत, तर आणखी थोडावेळ त्यांना तसंच थांबवून ठेवावं. ते थोडेसे नाराज होतील. परंतु आधी पाकिस्तानला ही गोष्ट सांगावी. आम्ही जी गोष्ट केली आहे, ती थेट सांगावी, काहीही लपवण्याची गरज नाही. 12 वाजता ते फोनवर आले. त्यांच्याशी बोलणे झाले. त्यांना आम्ही सांगितले की, काल रात्री आम्ही अशा प्रकारे हल्ला केला आहे. आणि यानंतरच आम्ही हिंदुस्तानच्या प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींना आणि संपूर्ण दुनियेला माहिती दिली. भारत आणि भारताच्या लष्कराला हे करण्याचा अधिकार होता. आम्हाला न्याय मिळवण्याचा अधिकार होता, तो आम्ही मिळवला आणि हल्ला केला. आम्ही केलेला सर्जिकल स्ट्राईक म्हणजे भारताच्या शूरवीर जवानांचा पराक्रम होताच, यामध्ये कोणतीच शंका नाही. परंतु दहशतावादाचा निर्यात करत असलेल्यांना समजले पाहिजे की, आता हिंदुस्तान बदलला आहे.

प्रसून जी – मोदीजी, आपण पराक्रमाची चर्चा केली, लष्कराच्या कामगिरीची गोष्ट केली. लष्कराने इतका मोठा त्याग केला असूनही या क्षेत्रामध्ये आपण राजकारणाचा प्रवेश होत असल्याचे दिसून येते. लष्कराने दाखवलेल्या अफाट शौर्याबद्दलही लोक प्रश्नचिन्ह दाखवण्यास तयार असतात. या गोष्टीकडे तुम्ही कसे पाहता?

पंतप्रधान – असं आहे पहा, या व्यासपीठाचा उपयोग मी राजकीय प्रतिस्पर्धकांवर टीका करण्यासाठी करू इच्छित नाही, असं पुन्हा एकदा नमूद करतो. आणि मी इतकंच म्हणतो की, ईश्वराने सर्वांना सद्बुद्धी द्यावी.

प्रसून जी – मोदीजी, आत्तापर्यंत आपण परिवर्तनाची चर्चा केली. अधीरतेची, उत्सुकतेची चर्चा केली. असं म्हणतात की, जिथे रवि पोहोचत नाही, तिथं कवि पोहोचतात. कवी असल्यामुळे मी हे म्हणतोय, असं नाही. परंतु विकासाची गंगा सर्वांपर्यंत पोहोचली तरच खरी प्रगती झाली आहे, असं म्हणता येणार आहे. आपल्या बोलण्यामध्ये आज आलेच की, कोणतीही संस्कृती, सभ्यता स्वतःविषयी गर्व करीत नाही. आपण समाजामधल्या ज्येष्ठांविषयी बोललो, इतर सामाजिक घटकांविषयी बोललो. मात्र या समाजातल्या अगदी शेवटच्या स्तरापर्यंत, शेवटच्या घटकाचा विचार केला गेला नाही तर  संस्कृती योग्य ठरणार नाही.

कार्यक्रमाच्या या भागामध्ये आम्ही अशा वर्गाविषयी बोलणार आहोत की, आपल्याला हा वर्ग माहीत असतो, तरीही आपले कधी फारसे लक्ष त्या वर्गाकडे जात नाही. खूप मोठमोठ्या योजनांच्या गोंधळामध्ये ज्यांच्या हिताकडे कुणाचेही फारसे लक्ष जात नाही. जणू त्यांचे हित हरवून जाते. ज्याप्रमाणे ढोलाच्या गगनभेदी आवाजापुढे बाँसुरीचा स्वर कुणाच्याही कानावर पडत नाही. तसे या घटकाचे होते. चला आपण काही प्रतिमा पाहू या.

मोदीजी, आपण लालकिल्ल्यावरून प्रथमच शौचालयाचा मुद्दा मांडला. कोणत्याही पंतप्रधानाने अशा प्रकारे पहिल्यांदाच सर्वांना खूप छोटा वाटणारा परंतु प्रत्यक्षात अतिशय महत्वाचा असलेला मुद्दा बोलून दाखवला, त्याला प्राधान्य दिले, हे आम्ही पाहिले आहे. आता मुद्यांचा प्राधान्यक्रम बदलला आहे. अशाप्रकारे  कोणत्या मुद्याला प्राथमिकता दिली पाहिजे, याचा निर्णय आपण घेता का? आणि हा निर्णय कशाप्रकारे घेतला जातो, आणि हे मुद्दे प्राधान्यक्रमामध्ये कसे काय वर आले?

पंतप्रधान – असं आहे की, स्वातंत्र्यानंतर 70 वर्षे कोणत्याच सरकारने या विषयांकडे लक्ष दिले नाही, असं तर मी म्हणणार नाही. असं म्हणणं म्हणजे त्या सरकारांवर अन्याय केल्यासारखे होईल. म्हणून मी अशाप्रकारे कोणतीही गोष्ट बोलत नाही. आणि मी तर लालकिल्ल्यावरून असंही म्हणालो होतो की, आज हिंदुस्तान ज्या स्थानी आहे, तिथंपर्यंत येण्यासाठी स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंत आलेल्या सर्व सरकारांचे, सर्व पंतप्रधानांचे, सर्व राज्य सरकारांचे, सर्व मुख्यमंत्र्यांचे, सर्व लोकप्रतिनिधींचे कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये योगदान आहे. हे मी लालकिल्ल्यावरून बोललो होतो आणि मला तसंच वाटतं. परंतु इतक्या योजना बनवण्यात आल्या, इतक्या प्रचंड प्रमाणात पैसा खर्च होत होता, तरीही जनसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनामध्ये परिवर्तन का आले नाही, येत नव्हते?त्याच्या मागच्या कारणांचाही विचार केला पाहिजे ना?

महात्मा गांधी यांनी आपल्या लोकांना एक सिद्धांत दिला होता आणि मी वाटतं की, कोणत्याही विकसित देशाच्या दृष्टीने त्याच्या इतका उत्तम सिद्धांत असू शकत नाही. महात्मा गांधी यांनी म्हणाले होते, कोणतीही नीती, योजना तयार करा, तिला एकदा तराजूमध्ये तोला आणि त्या योजनेचा समाजातल्या सर्वात अखेरच्या घटकाला नेमका किती उपयोग होणार आहे, समाजाच्या तळागळामध्ये  असलेल्या व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन घडवून येण्यासाठी ती योजना प्रभावी ठरणार आहे की नाही, याचा विचार केला गेला पाहिजे. महात्मा गांधी यांची ही गोष्ट मला अगदी मनापासून पटते. आम्ही कितीही चांगली, मोठी योजना बनवली, खूप दीर्घकाळ चर्चा -विनिमय करीत राहिलो, परंतु ज्या समाजासाठी हे सगळं केलं जात आहे, त्या समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत, अखेरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत आहोत की नाहीत, आम्ही नेमके कुठं जात आहोत?

मी अतिशय कठिण काम स्वीकारलं आहे, हे मी चांगलंच जाणतो. कदाचित कुणाला तरी माझ्या कामातील काही नकारात्मक मुद्दे दिसत असण्याची शक्यता आहे. परंतु यासाठी काय काम करणंच सोडून द्यायचे काय? गरीब लोकांना आहे तसेच, त्यांना सोसू देत हाल असं म्हणून, सोडून द्यायचे का? एखाद्या लहानग्या बालिकेवर अत्याचार केला जातो. ही किती भयानक, त्रासदायक घटना आहे, अशा घटनांमुळे किती क्लेश होतात, याची आपण कल्पना करू शकतो. अशा वेळी तुमच्या सरकारच्या काळामध्ये इतके अत्याचार होत होते, माझ्या सरकारमध्ये इतके होतात, असं आपण म्हणत बसणार आहोत का? मला वाटतं की, याच्यापेक्षा चुकीचा रस्ता दुसरा कोणताच असू शकणार नाही. अत्याचार हा अत्याचारच असतो. एका कन्येवर झालेला अत्याचार कसा काय सहन केला जावू शकतो? आणि म्हणूनच मी लालकिल्ल्यावरून हाच विषय जरा वेगळ्या, नव्या पद्धतीने मांडला होता. मी म्हणालो होतो, जर संध्याकाळच्या वेळेस घरातली मुलगी थोडी उशीरा घरी आली तर प्रत्येक आई-वडील लगेच विचारतात, कुठं गेली होतीस? कशासाठी गेली होतीस? कोणाला भेटलीस? फोनवर जर मुलगी बोलताना दिसली तर मुलगी बोलताना दिसली तर आई लगेच म्हणते, आता पुरे झालं बोलणं, कोणाशी बोलत होतीस?काय काम होतं?

अरे, सगळेजण मुलींना तर विचारतातच, कधी आपल्या मुलांनाही विचारा की, बाबा रे, कुठं गेला होतास? ही गोष्ट मी लालकिल्ल्यावरून बोललो होतो. आणि मला असं वाटतं की, ही एकप्रकारची समाजातली वाईट गोष्ट आहे. व्यक्तीमधली वाईट गोष्टच नाही तर ती एक विकृती आहे. सगळं काही असतानाही देशाच्या दृष्टीने हा एक चिंतेचा विषय बनला आहे. आणि असे पाप करणारा कोणाचा तरी मुलगा आहे. त्याच्या घरामध्येही माता आहे.

आपण कल्पना करू शकता की, स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनीही भारतामध्ये शौचालय असण्याचे प्रमाण 35-40 टक्क्यांच्या जवळपास होते. आजही आमच्या माता-भगिनींना या समस्येशी सामना करावा लागत आहे. या सगळ्या प्रकारामागे आणखी कारणेही आहेत. मला कोणतेही पुस्तक वाचून गरीबी म्हणजे काय असते, हे जाणून, शिकून घ्यावं लागलं नाही. मला काही टी.व्ही.च्या पडद्यावरून गरीबी काय असते, हे कोणी समजून सांगण्याची गरज पडली नाही. मी ते आयुष्य वास्तवामध्ये जगलो आहे. गरीबी कशी असते, मागासलेपण काय असते, गरीबाला जगण्यासाठी जीवनात कशाप्रकारे जिद्दीनं काळाशी सामना करावा लागतो, हे मी स्वतः अनुभवलं आहे. जगण्यासाठीची रोजची लढाई मी पाहून,करून इथंवर आलो आहे.

आणि म्हणूनच मी असं अगदी ठामपणे वाटतं की, राजकारण आपल्या एका जागी आहे. माझी आहे ती समाजनीती असं म्हणता येईल, किंवा माझी राष्ट्रनीती असं म्हणता येईल, त्या दृष्टीने या सगळ्यांच्या जीवनात काहीतरी परिवर्तन घडवून आणले पाहिजे, असं मला  वाटतं. मी हा बदल घडवून आणेन, असं वाटलं. आणि म्हणूनच मी लालकिल्ल्यावरून सांगितलं की, आम्ही ज्या 18 हजार गावांमध्ये अद्याप वीज पोहोचली नाही, याचा अर्थ बाकी गावांमध्ये वीज पोहोचली आहे. ज्या कोणी ही वीज पोहोचवली, त्या लोकांना शत-शत नमस्कार! मात्र स्वातंत्र्याला  70 वर्षे झाल्यानंतरही जर 18 हजार गावे अंधारामध्ये राहतात, त्यांनी वीज मिळत नाही, याचीही जबाबदारी आम्ही लोकांनी घेतली पाहिजे.

आणि मी सरकारी कार्यालयांना विचारले, आता तुम्हीच सांगा हे काम किती कालावधीमध्ये करणार? कोणी उत्तर दिले, सात वर्ष लागतील. मी म्हणालो, सात वर्षे मी वाट पाहू शकत नाही. आणि मी लालकिल्ल्यावरून घोषणा केली की, आम्ही 1000दिवसांमध्ये हे काम पूर्ण करू इच्छितो. काम अवघड होते. अतिशय दुर्गम भागांमध्ये वीज पोहोचवायची होती. काही भागात दहशतवादी, माओवादी लोकांचा प्रभाव होता. तरीही जवळपास 18 हजार गावांमध्ये वीज पोहोचवण्याचे काम आम्ही केले. आता कदाचित दीडशे, पावणे दोनशे गावांचे विद्युतीकरणाचे काम शिल्लक राहिले आहे. काम थांबलेले नाही, सुरूच आहे.

आपण कल्पना करू शकता, की गरीब माता शौचालयाला जाण्यासाठी सूर्योदयाच्या पूर्वी जंगलामध्ये जाते. आणि दिवसभरामध्ये जर कधी जाण्याची वेळ आलीच तर शारीरिक पीडा सहन करीत संध्याकाळ होण्याची वाट पाहत बसते. अशावेळी शौचालयाला जाता येत नाही, याचा किती त्रास त्या माता-भगिनीला होत असेल? किती यातना होत असेल? तिच्या शरीरावर हा एकप्रकारे अत्याचारच होत असणार की नाही? तिच्यासाठी आपण एक शौचालय नाही बनवू शकत? हा प्रश्नामुळे मला झोप लागत नव्हती. आणि त्याचवेळी माझ्या मनाने उचल खाल्ली की, आता कुणाची काहीही भीडभाड ठेवायची नाही, आणि थेट लालकिल्ल्यावरूनच हा शौचालयाचा, स्वच्छतेचा विषय मांडायचा. ही फार मोठी जबाबदारी असणार आहे. परंतु माझ्या लक्षात आले की, संपूर्ण देशभरातून या मोहिमेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. आता माझ्या देशातील जवळपास तीन लाख गावांमध्ये उघड्यावर शौच करण्याची पद्धत बंद झाली आहे. आणि हे शौचालये बनवण्याचे काम आता वेगाने होत आहे. कोणत्याही योजनेचा समाजातल्या शेवटच्या घटकाला लाभ मिळाला पाहिजे, ही लोकशाहीमध्ये सरकारची सर्वात प्राथमिक जबाबदारी आहे.

अशाच प्रकारे आता आम्ही संकल्प केला होता की, प्रत्येक गावामध्ये वीज पोहोचवायची. आता आम्ही निर्धार केला आहे की, देशातल्या प्रत्येक घरामध्ये वीज असली पाहिजे. घराघरांत वीज पोहोचवायची आहे. चार कोटी कुटुंब आजही अंधारामध्ये राहतात. भारतामध्ये एकून 25 कोटी परिवार आहेत. देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटी आहे, परंतु जवळपास 25 कोटी परिवार आहेत. स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली तरी चार  कोटी परिवार आजही 18व्या शतकात असल्यासारखे आयुष्य जगत आहेत. या कुटुंबामध्ये आजही दिव्याचाच प्रकाश आहे.

सौभाग्य योजनेमधून या चार कोटी कुटुंबांना आम्ही मोफत वीज जोडणी देण्याचा संकल्प केला आहे. आमच्या या संकल्पामुळे अंधारामध्ये जगणारे हे लोक संपूर्ण दुनियेशी जोडले जाणार आहेत. त्यांची मुले शिकू शकणार आहेत, त्यांच्या घरामध्येही संगणक येईल, मोबाईल चार्ज होईल आणि ते दुनियेशी जोडले जातील. टी.व्ही. घेण्याचा खर्च मिळाला तर ते टी.व्ही. पाहू शकतील. या अंधारात राहणा-या लोकांना दुनियेशी जोडण्यासाठी अधीरता, उत्सुकता मला निर्माण करायची आहे. त्यांच्यामध्ये अशी अधीरता निर्माण झाली तर ही मंडळी काहीही करण्यासाठी तयार होतील. माझ्याशी ते जोडले जाणे हेच तर सक्षमीकरण आहे. मी गरीबांना सक्षम करून गरीबीच्या विरोधात लढण्यासाठी माझ्या सहकारी वर्गाची जणू एक फौज तयार करू इच्छितो. ही फौज गरीब लोकांमधूनच तयार होईल आणि गरीबीच्या विरोधात लढेल. असे केले तरच गरीबी संपणार आहे. ‘गरीबी हटाओ’ अशा घोषणा देवून कधी गरीबी संपुष्टात येत नाही.

प्रसून जी – मोदीजी, आपण तर खूप परिश्रम करता, खूप काम करता,  हे तर सगळेच जाणून आहेत. परंतु आपण  एकटेच देशाला बदलू शकणार आहात का?

पंतप्रधान – असं आहे की, मी परिश्रम करतो, खूप काम करतो, ही गोष्ट आपण आत्ता बोललात. आणि मला वाटतं की, याविषयी देशामध्ये कोणताही विवाद नाही. मी परिश्रम करतो, खूप काम करतो, हा मुद्दाच नाही. जर मी काम करत नसतो तर मात्र मुद्दा झाला असता. माझ्याकडे प्रामाणिकपणाची एक पूंजीच आहे. माझ्याकडे सव्वाशे कोटी देशवासियांचे प्रेम आहे, हीसुद्धा एक पूंजी आहे. आणि  म्हणूनच मला जास्तीत जास्त परिश्रम केले पाहिजेत. आणि मी देशवासियांला  सांगू इच्छितो की, मी सुद्धा अगदी आपल्याप्रमाणेच एक सामान्य नागरिक आहे. ज्या एखाद्या सामान्य व्यक्तीमध्ये, माणसामध्ये  असतात, तशाच, तितक्याच कमतरता माझ्यामध्येही आहेत.

कोणीही मला वेगळे समजण्याची गरज नाही. आपण सर्वांनी मी आपल्यासारखाच एक आहे, असे समजा आणि तीच वस्तूस्थिती आहे. मी आज एका विशिष्ट स्थानावर बसलो आहे, तो एका व्यवस्थेचा भाग आहे. परंतु मी आपल्यापैकीच एक आहे. आपल्यापेक्षा वेगळा अजिबात नाही. माझ्या मनामध्ये एक विद्यार्थी आहे. आणि मी माझ्या शिक्षकांचा खूप आभारी आहे. लहानपणी त्यांनीच मला मार्ग दाखवला. आणि त्यांनी शिकवलं त्यामुळे आपल्या आतमधला विद्यार्थी कधीच मरू दिला नाही. त्यामुळे मी सतत काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करीत असतो. नवीन काही समजून घेण्याचा प्रयत्न माझा सातत्याने सुरू असतो. मी ज्यावेळी निवडणूक लढवत होतो, त्यावेळी मी देशवासियांना सांगितलं होतं की,माझ्याकडे देश चालवण्याचा अनुभव नाही. माझ्याकडून चूक होवू शकते. परंतु मी देशवासियांना असाही विश्वास दिला होता की, मी चुका करू शकतो. परंतु मनामध्ये वाईट हेतू ठेवून मी चुकीचं काम कधीच करणार नाही.

गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून दीर्घकाळ कार्य करण्याची संधी मला मिळाली. पंतप्रधान म्हणून आता चार वर्षे होत आली आहेत. देशाचा प्रधानसेवक म्हणून मी काम केले आहे. परंतु कोणताही चुकीचा हेतू बाळगून मी काम करणार नाही, असा वचन मी देशाला दिले आहे.

आता प्रश्न उपस्थित झाला आहे तो, मी देश बदलू शकणार आहे का? देशाला बदलण्याचा मी कधी विचारच केला नाही. परंतु माझ्या मनात अगदी ठाम विश्वास आहे की, माझ्या देशामध्ये जर लाखों समस्या आहेत, तर त्या समस्यांवर सव्वाशे कोटी उत्तरं आहेत. जर लक्षावधी समस्या आहेत तर अब्जावधी उत्तरंही आहेत. शे सव्वाशे कोटी देशवासियांच्या शक्तीवर, क्षमतेवर माझा संपूर्ण विश्वास आहे. आणि मी या विश्वासाचा  चांगला अनुभवही घेतला आहे. कोणी कल्पनाही करू शकणार नाही असे अनुभव नोटबंदीच्या काळात आले आहेत.

अर्जेन्टीनाचे  राष्ट्रपती मला भेटले होते, ते माझे चांगले स्नेही आहेत. ते मला म्हणाले, ‘‘ मी आणि माझी पत्नी बोलत होतो की, माझा दोस्त तर आता गेला.’’ मी म्हणालो, अरेच्या असं काय होईल? तर म्हणाले, ‘‘तू ही नोटबंदी आणली, आता तुला त्याची किंमत मोजावी लागणार, जावं लागणार. वेनेजुएलामध्ये असेच प्रकरण सुरू होतं, तिथे सत्तापालट झाला. आमच्या शेजारी असल्यामुळे ते सगळं माहिती होतं. त्यामुळं आम्हाला वाटलं की, आपल्या दोस्तालाही आता जावं लागणार, अशी चर्चा मी आणि माझी पत्नी करत होतो.’’

विचार करा, देशामधले 86 टक्के चलन व्यवहारातून बाहेर काढल्यानंतर किती गोंधळ निर्माण झाला होता. टी.व्ही.च्या सगळ्या वाहिन्यांवर तर सातत्याने सरकारच्या विरोधात जोरदार आक्रमण होत होतं. परंतु सामान्य देशवासियांवर माझा विश्वास होता. कारण मला माहीत आहे, माझा देश प्रामाणिकपणासाठी संघर्ष करतोय. माझ्या देशाचा सामान्य नागरिक प्रामाणिकपणासाठी कष्ट झेलण्यासाठी सिद्ध आहे. ही जर माझ्या देशाची ताकद- शक्ती आहे, तर मला त्या शक्ती अनुसार आपला कार्य करता आले पाहिजे. आणि त्याचेच परिणाम आता दिसून येत आहेत. आज जे काही चांगले परिणाम दिसताहेत त्याल फक्त निमित्तमात्र मोदी कारणीभूत आहेत. वास्तविक मोदीची खरी गरज इथेच आहे. कोणाला जर दगड उचलून मारायचा असेल तर कोणाला मारणार? कुणाच्या अंगावर कचरा टाकायचा असेल तर कुणावर फेकणार? कुणाला अपशब्द बोलायचे असतील तर कुणाला बोलणार?

माझ्या सव्वाशे कोटी देशवासियांवर दगडफेक होत नाही, कोणी चिखलफेक करीत नाही, कोणी अपशब्द उच्चारत नाही, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. जे काही होत आहे, झाले आहे, ते मी एकट्यानेच सोसले, सहन केले, झेलत राहिलो आहे. आणि मी तर आपल्याप्रमाणे काही कवी नाही. परंतु प्रत्येक युगामध्ये काही ना काही तरी लिहितच असतात. आपल्यापैकी सगळ्यांनी लिहिले असेल. परंतु आपण सगळेच काही कवी बनू शकत नाही. कवी तर प्रसून बनू शकतात. परंतु मी सुद्धा थोडं फार लिहिले आहे.

प्रसून जी – जी.

पंतप्रधान – ज्याप्रकारचे मी आयुष्य जगलो आहे, त्या काळामध्ये अशा गोष्टी झेलणे खूप स्वाभाविक होते. ठेचकाळत, ठेचकाळत मी इथंपर्यंत आलो आहे. अनेक समस्यांचा सामना आत्तापर्यंत करावा लागला आहे. मी लिहिलं होतं. आज मला माझीच पूर्ण कविता स्मरणामध्ये नाही. परंतु जर कोणाला इच्छा आणि आवड असेल तर माझं एक पुस्तक आहे, त्यामध्ये मी काय लिहिले आहे, हे वाचता येईल. मी त्यामध्ये लिहिले होते –

‘‘ जे लोक माझ्यावर दगड फेकतात, त्याच दगडांना मी माझ्या पायातळाचा दगड बनवतोय आणि त्याच दगडांच्या पाय-यांवरून चालत मी आज पुढे जात आहे.

आणि म्हणूनच माझी संकल्पना आहे की ‘टीम इंडिया’ म्हणजे काही फक्त सरकारमध्ये बसलेले लोक नाहीत. नोकरशाह आहेत, राज्य सरकारे आहेत, संघराज्य संरचनेसाठी माझ्या दृष्टीने खूप महत्व आणि प्राधान्य आहे. सहकारी महासंघांचा कारभार मी स्पर्धात्मक सहकारी महासंघाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला आहे.

अलिकडेच मी देशातल्या इतर जिल्हयांच्या तुलनेमध्ये मागास राहिलेल्या विकासोन्मुख 115 जिल्हांची निवड केली आहे. त्यांच्या जिल्हयांमध्ये विकास घडवून यावा, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. मी तुमच्याबरोबर आहे, असा विश्वास त्यांना दिला आहे. आता त्यांचा उत्साह वाढतोय. आणि ते लोक कामही चांगले करत आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे या गावांमध्ये शौचालयाचे लक्ष्य पूर्ण होत आहे. 18 हजार गावांमध्ये वीज पोहोचली आहे. कोणी मोदी विद्युत खांब उभारण्यासाठी गेला होता का? विजेचे खांब उभारण्यासाठी तर माझे देशवासियच गेले होते. रात्री अंधाराचे साम्राज्य असलेल्या गावी वीज पोहोचवण्याचे काम माझ्या देशवासियांनी केले आहे. आणि म्हणूनच महात्मा गांधी यांची एक गोष्ट मी एका मंत्राप्रमाणे स्वीकारली आहे. स्वातंत्र्यासाठी वेडे झालेले अनेकजण होते, स्वातंत्र्यासाठी प्राणांची बाजी लावणारेही अनेक लोक होते, आणि त्यांच्या त्यागाची, त्यांच्या तपस्येचे मूल्य कधीच कमी होणार नाही. त्यांच्या अमूल्य  हौतात्म्याची कधीच भरपाई करता येणार नाही. परंतु गांधीजींनी स्वातंत्र्याच्या लढ्याला जनआंदोलनाचे स्वरूप दिले. मी विकासाला जनआंदोलन बनवत आहे.

मोदी एकटेच काही करणार नाहीत. आणि मोदींनी काही केलेही नाही पाहिजे.

परंतु देशाने सगळं काही करावं, असं म्हटलं जातं.  मोदीही कधी काळी असंच म्हणत होते. ज्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून काम करत होतो, त्यावेळी म्हणायचो, आपला देश असा आहे, सरकारने कोणत्याही अडथळे आणणे बंद केले तर देश खूप वेगाने पुढे जावू शकणार आहे. हाच मूलभूत विचार आजही माझा कायम आहे. आणि त्यानुसार चालणारा मी माणूस आहे.

प्रसून जी – कवितेविषयी आपण आत्ता बोललात त्यामुळे मी आपल्यासमोर एक कविता ऐकवतो. ही जी कविता आहे, ती मला वाटते की, भारतावरच आहे, भारताला तंतोतंत लागू पडते. आपल्यालाही लागू पडते. आपण मला काय म्हणायचे आहे ते समजून घ्यावे.

कि सर्प क्‍यों इतने चकित हो? सर्प क्‍यों इतने चकित हो? दंश का अभ्‍यस्‍त हूं।

सर्प क्‍यों इतने चकित हो? दंश का अभ्‍यस्‍त हूं? पी रहा हूं विष युगों से, सत्‍य हूं, आश्‍वस्‍त हूं।

सर्प क्‍यों इतने चकित हो? दंश का अभ्‍यस्‍त हूं, पी रहा हूं विष युगों से, सत्‍य हूंए आश्‍वस्‍त हूं।

ये मेरी माटी लिए है गंध मेरे रक्‍त की, जो कह रही है मौन कीए अभिव्‍यक्‍त की।

मैं अभय लेकर चलूंगा, मैं विचलित न त्रस्‍त हूं।

सर्प क्‍यों इतने चकित हो? दंश का अभयस्‍त हूं।

है मेरा उद्गम कहां पर और कहां गंतव्‍य है?

दिख रहा है सत्‍य मुझको, रूप जिसका भव्‍य है।

मैं स्‍वयं की खोज में कितने युगों से व्‍यस्‍त हूं।

सर्प क्‍यों इतने चकित हो? दंश का अभयस्‍त हूं।

है मुझे संज्ञान इसका बुलबुला हूं सृष्टि में,

है मुझे संज्ञान इसका बुलबुला हूं सृष्टि में।

एक लघु सी बूंद हूं मैं, एक लघु सी बूंद हूं मैं, एक शाश्‍वत वृष्टि मैं।

है नहीं सागर को पानाए मैं नदी सन्‍यस्‍त हूं।

सर्प क्‍यों इतने चकित हो? दंश का अभयस्‍त हूं।

पंतप्रधान – प्रसून जी आम्ही सगळे आणि मी आपल्या भावनांचा आदर करतो. परंतु आमच्या नसांमध्ये असेच भाव राहिले आहेत. – अमृतस्य पुत्रा वयं.

असाच भाव उराशी बाळगत आम्ही मोठे झालो, वाढलो आहोत. आणि म्हणूनच माझ्या देशातल्या प्रत्येकाने दंश सहन केले आहेत. विषही प्याले आहे. त्रास सहन केला आहे, अपमान सहन केला आहे. परंतु आपल्या स्वप्नांना कधीच मृतप्राय होवू दिलं नाही.

आणि हाच उत्साह, हीच भावना देशाला नवीन, विक्रमी उंचीवर नेण्याची ताकद देत असतो, असा अनुभव मी नेहमीच घेतो.

प्रसून जी – आपण इथं काही प्रश्न घेणार आहोत. श्री.सॅमुअल डाउजर्ट यांचा एक प्रश्न आहे. ते आपल्याला विचारू इच्छितात. जी आपल्याबरोबर जर कोणी असेल तर आपण आपला प्रश्न त्याला लिहून द्यावा. ते आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. फक्त आपण जरा प्रश्न लिहून द्यावा. आपण दिल्यानंतर मी तो प्रश्न विचारतो. मी आपले नाव जाहीर करतो.

सॅमुअल डाउजर्ट – Good Evening Mr. Prime Minister. What is your opinion about Modicare? Everyone is talking about it.Thank You

प्रसून जी – मला वाटतं की मोदी केअर, अशाच प्रकारे ओबामा केअर, मोदी केअरच्या मध्ये एक समांतर काही करण्यात आलं आहे. याचा अर्थ आरोग्य क्षेत्राविषयी आपण कदाचित चर्चा करू इच्छित आहात.

पंतप्रधान – असं आहे की, तीन गोष्टींचा मी आग्रह धरतो. असा माझा अनुभव आहे. यामध्ये काही खूप मोठ मोठ्या गोष्टी आहेत असं अजिबात नाही. मी ज्या पाश्र्वभूमीतून आलो आहे, त्याचा विचार करता, हे योग्य आहे, असे मला वाटते. माझे भाऊ मेघनाथभाई इथं बसले आहेत. इतर कोणत्याही प्रकारे चर्चा करण्याची माझी परंपरा नाही. परंतु तीन गोष्टींचा माझा आग्रह कायम असतो. एक म्हणजे, मुलांचे शिक्षण, युवावर्गाला कमाईचे साधन आणि वयोवृद्धांना औषधे. स्वस्थ समाजासाठी या तीन गोष्टींची आपल्याला चिंता करण्याची अतिशय आवश्यकता आहे. माझ्या अनुभवावरून सांगतो, कितीही चांगले कुटूंब असले तरी, कोणतेही व्यसन नसले तरी, किंवा कोणत्याही वाईट गोष्टी नसल्या तरी, काही, काही वाईट नाही, सगळे काही खूप चांगल्याप्रकारे चालत असेल आणि ते कुटूंब आनंदात, समाधानात असेल, कोणतीही वाईट गोष्ट घडली नाही तरी, जर त्या परिवारामध्ये जर कोणाला आजारपण आले. कल्पना करा, घरातली कन्या मोठी होतेय. आता तिच्या विवाहाचे पहायचे आहे. आणि घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडली, तर संपूर्ण नियोजनच ढासळून जाते. त्या विवाहयोग्य मुलीचा विवाह करायचा राहून जातो. घरामध्ये एका सदस्याला आलेले आजारपण संपूर्ण परिवाराची स्वप्ने, इच्छा, आकांक्षा धुळीला मिळवून टाकते.

एक गरीब माणूस, ऑटो रिक्षा चालवून घरासाठी कमाई करणारा जर आजारी पडला तर काय होतं. तो एकटाच आजारी पडत नाही, तर संपूर्ण घर आजारी होवून जाते. घराची सगळी व्यवस्था आजारी होते. आणि या गोष्टीचा आम्ही विचार करून आरोग्य क्षेत्रामध्ये एक खूप मोठी सर्वसमावेशक दृष्टिकोनातून योजना तयार केली. काही लोक याला मोदी केअरच्या रूपाने आज प्रचलित करीत आहेत. मुळात ही योजना आहे, ‘आयुष्मान भारत‘. आणि यामध्ये आम्ही संरक्षणात्मक आरोग्य सुविधा पुरवणार आहे. परवडणा-या दरामध्ये औषधोपचार देण्यात येणार आहेत. अशा प्रकारे एक शाश्वत साखळी तयार करण्यात येणार आहे. अशा अनेक गोष्टींचा विचार त्यामध्ये करून पुढे जात आहोत.

या योजनेचे दोन घटक आहेत. एक म्हणजे, आम्ही देशामध्ये जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त वेलनेस सेंटर तयार करणार आहोत. या केंद्रांमध्ये आजूबाजूच्या 12-15 गावांतल्या लोकांसाठी सर्व प्रकारची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देता येणार आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यामुळे मोठ्या रूग्णालयांशी संपर्क साधून आलेल्या रूग्णावर उपचारासाठी तातडीने मार्गदर्शन करता घेता येणार आहे. तसेच आवश्यक त्या औषधांचा पुरवठा करता येणार आहे.

दुसरा भाग आहे तो म्हणजे संरक्षणात्मक आरोग्य सुविधेचा. यालाही आम्ही प्राधान्य देणार आहे. यामध्ये मग योग, जीवनशैली यांचाही विचार संरक्षणात्मक आरोग्य सेवेमध्ये केला जाणार आहे. यामध्ये पौष्टिक आहार मार्गदर्शनचा समावेश आहे. आम्ही एक पोषण मोहीम सुरू केली आहे. महिला आणि बालकांसाठी आरोग्य सेवा आहे, त्याव्दारे ही मोहीम चालवली जाते.

जगभरातल्या समृद्ध देशांमध्येही आजही मातृत्व रजेविषयी फारशी उदारता दाखवली जात नाही. मात्र आमच्या सरकारने तशी उदारता दाखवली आहे.गर्भवती, नवमाता आणि नवजात बालके यांच्या आरोग्याचा विचार करून, त्यांच्या आरोग्याची चिंता लक्षात घेवून, आमच्या सरकारने आता मातृत्वाची रजा 26 आठवडे केली आहे. मला माहीत आहे की, ही माहिती मिळाल्यानंतर यू.के.मधले लोक नक्कीच आनंदी होतील.

आणखी एक  बाजू आरोग्याविषयी आम्ही केली आहे. भारतामध्ये जवळपास दहा कोटी परिवार म्हणजे 50 कोटी जनता, याचाच अर्थ जवळपास निम्म्या लोकसंख्येला लाभ मिळू शकेल, अशी आरोग्य विमा योजना आम्ही तयार केली आहे. यामध्ये वर्षभरामध्ये पाच लाख रूपयांपर्यंत आजारपणाचा खर्च सरकार करणार आहे. एका वर्षभरात कुटुंबामधल्या कोणालाही, कितीही व्यक्तींना आजारपण आले, तर त्या कुटुंबाचा पाच लाखापर्यंतचा खर्च सरकारकडून करण्यात येणार आहे. या कारणामुळे आता गरीब व्यक्तीला आजारपणात औषधोपचार मिळू शकणार आहेत. आजारी पडलो तर काय करायचे, या भयापासून गरीबाची आम्ही मुक्तता केली आहे.

हे कार्य भगीरथाचे आहे, हे मला माहीत आहे. परंतु कोणी तरी ते करायलाच पाहिजे होते.

दुसरे म्हणजे जी खाजगी रूग्णालये येण्याची शक्यता आहे, त्यांचे देशातल्या दोन क्रमांकाच्या, तीन क्रमांकाच्या,  शहरांमध्ये चांगल्या रूग्णालयांची एक साखळी तयार होवू शकणार आहे. कारण त्यांना माहीत आहे की, आता रूग्ण येणार आहेत. आता रूग्णांचे पैसे कोणीतरी देणारा आहे, त्यामुळे खाजगी रूग्णालयांची संख्या वाढण्यास मदत मिळणार आहे.

एखाद्याला साधे आजारपण आले तर तो विचार करतो की, अरे, कशाला रूग्णालयामध्ये जायचे, असेच दोन दिवसांत आपण बरे होवू. असे म्हणून गरीब माणूस आजारपण अंगावर काढतो. परंतु आता गरीबाला तसे करण्याची अजिबात गरज नाही. रूग्णाला आणि रूग्णालयालाही माहीत आहे, की आपल्या औषधोपचाराचा खर्च मिळणार आहे. आणि त्यामुळेच रूग्णालयांची साखळी बनणार आहे.

आणि मला असं वाटतं की, आगामी काळामध्ये आपल्यापैकी ज्यांना कुणाला आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे, त्यांना एक हजारांपेक्षा जास्त चांगली रूग्णालये निर्माण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आणि ही संधी कायम अशीच असणार आहे.

अगदी याचप्रमाणे औषधांचे आहे. औषधांचे पॅकिंग चांगले असते. औषधे लिहून देत असल्याबद्दलही काही मिळत असते. आपल्याला माहीत असेलच की, डॉक्टरांची परिषद कधी सिंगापूरला होते, कधी दुबईला होते. तिथं काही आजार पसरला आहे, म्हणून ही मंडळी जात नाहीत. तर औषध निर्माण करत असलेल्या कंपन्यांना त्यांना घेवून जाणे महत्वाचे वाटते.

यावर तोडगा म्हणून आम्ही काय केले ते सांगतो. जेनेरिक औषध विक्री सुरू केली. ही औषधे तितक्याच उत्तम दर्जाची असतात. जे औषध 100 रूपयांना बाहेर असते, तेच औषध जेनेरिक औषधांच्या दुकानामध्ये 15 रूपयांना मिळते. आम्ही देशभरामध्ये जवळपास 3 हजार जन-औषधालये सुरू केली आहेत. आणि आता ही संख्या वाढवण्यात येणार आहे. यामुळे सामान्य जनतेला त्याचा लाभ मिळू शकेल. या जन-औषधालयांचा प्रचारही आम्ही करीत आहोत. परंतु देशाने सगळं काही करावं, असं म्हटलं जातं.  मोदीही कधी काळी असंच म्हणत होते. ज्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून काम करत होतो, त्यावेळी म्हणायचो, आपला देश असा आहे, सरकारने कोणतेही  अडथळे आणणे बंद केले तर देश खूप वेगाने पुढे जावू शकणार आहे. हाच मूलभूत विचार आजही माझा कायम आहे. आणि त्यानुसार चालणारा मी माणूस आहे.

प्रसून जी – कवितेविषयी आपण आत्ता बोललात त्यामुळे मी आपल्यासमोर एक कविता ऐकवतो. ही जी कविता आहे, ती मला वाटते की, भारतावरच आहे, भारताला तंतोतंत लागू पडते. आपल्यालाही लागू पडते. आपण मला काय म्हणायचे आहे ते समजून घ्यावे.

कि सर्प क्यों इतने चकित हो? सर्प क्यों इतने चकित हो? दंश का अभ्यस्त हूं।

सर्प क्यों इतने चकित हो? दंश का अभ्यस्त हूं? पी रहा हूं विष युगों से, सत्य हूं, आश्वस्त हूं।

सर्प क्यों इतने चकित हो? दंश का अभ्यस्त हूं, पी रहा हूं विष युगों से, सत्य हूंए आश्वस्त हूं।

ये मेरी माटी लिए है गंध मेरे रक्त की, जो कह रही है मौन कीए अभिव्यक्त की।

मैं अभय लेकर चलूंगा, मैं विचलित न त्रस्त हूं।

सर्प क्यों इतने चकित हो? दंश का अभयस्त हूं।

है मेरा उद्गम कहां पर और कहां गंतव्य है?

दिख रहा है सत्य मुझको, रूप जिसका भव्य है।

मैं स्वयं की खोज में कितने युगों से व्यस्त हूं।

सर्प क्यों इतने चकित हो? दंश का अभयस्त हूं।

है मुझे संज्ञान इसका बुलबुला हूं सृष्टि में,

है मुझे संज्ञान इसका बुलबुला हूं सृष्टि में।

एक लघु सी बूंद हूं मैं, एक लघु सी बूंद हूं मैं, एक शाश्वत वृष्टि मैं।

है नहीं सागर को पानाए मैं नदी सन्यस्त हूं।

सर्प क्यों इतने चकित हो? दंश का अभयस्त हूं।

पंतप्रधान – प्रसून जी आम्ही सगळे आणि मी आपल्या भावनांचा आदर करतो. परंतु आमच्या नसांमध्ये असेच भाव राहिले आहेत. – अमृतस्य पुत्रा वयं.

असाच भाव उराशी बाळगत आम्ही मोठे झालो, वाढलो आहोत. आणि म्हणूनच माझ्या देशातल्या प्रत्येकाने दंश सहन केले आहेत. विषही प्याले आहे. त्रास सहन केला आहे, अपमान सहन केला आहे. परंतु आपल्या स्वप्नांना कधीच मृतप्राय होवू दिलं नाही.

आणि हाच उत्साह, हीच भावना देशाला नवीन, विक्रमी उंचीवर नेण्याची ताकद देत असते, असा अनुभव मी नेहमीच घेतो.

प्रसून जी – आपण इथं काही प्रश्न घेणार आहोत. श्री.सॅमुअल डाउजर्ट यांचा एक प्रश्न आहे. ते आपल्याला विचारू इच्छितात. जी आपल्याबरोबर जर कोणी असेल तर आपण आपला प्रश्न त्याला लिहून द्यावा. ते आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. फक्त आपण जरा प्रश्न लिहून द्यावा. आपण दिल्यानंतर मी तो प्रश्न विचारतो. मी आपले नाव जाहीर करतो.

सॅमुअल डाउजर्ट – Good Evening Mr. Prime Minister. What is your opinion about Modi care? Everyone is talking about it. Thank You

प्रसून जी – मला वाटतं की मोदी केअर, अशाच प्रकारे ओबामा केअर, मोदी केअरच्या मध्ये एक समांतर काही करण्यात आलं आहे. याचा अर्थ आरोग्य क्षेत्राविषयी आपण कदाचित चर्चा करू इच्छित आहात.

पंतप्रधान – असं आहे की, तीन गोष्टींचा मी आग्रह धरतो. असा माझा अनुभव आहे. यामध्ये काही खूप मोठ मोठ्या गोष्टी आहेत असं अजिबात नाही. मी ज्या पार्श्वभूमी मधून आलो आहे, त्याचा विचार करता, हे योग्य आहे, असे मला वाटते. माझे भाऊ मेघनाथ भाई इथं बसले आहेत. इतर कोणत्याही प्रकारे चर्चा करण्याची माझी परंपरा नाही. परंतु तीन गोष्टींचा माझा आग्रह कायम असतो. एक म्हणजे, मुलांचे शिक्षण, युवावर्गाला कमाईचे साधन आणि वयोवृद्धांना औषधे. स्वस्थ समाजासाठी या तीन गोष्टींची आपल्याला चिंता करण्याची अतिशय आवश्यकता आहे. माझ्या अनुभवावरून सांगतो, कितीही चांगले कुटूंब असले तरी, कोणतेही व्यसन नसले तरी, किंवा कोणत्याही वाईट गोष्टी नसल्या तरी, काही, काही वाईट नाही, सगळे काही खूप चांगल्याप्रकारे चालत असेल आणि ते कुटूंब आनंदात, समाधानात असेल, कोणतीही वाईट गोष्ट घडली नाही तरी, जर त्या परिवारामध्ये जर कोणाला आजारपण आले. कल्पना करा, घरातली कन्या मोठी होतेय. आता तिच्या विवाहाचे पहायचे आहे. आणि घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडली, तर संपूर्ण नियोजनच ढासळून जाते. त्या विवाहयोग्य मुलीचा विवाह करायचा राहून जातो. घरामध्ये एका सदस्याला आलेले आजारपण संपूर्ण परिवाराची स्वप्ने, इच्छा, आकांक्षा धुळीला मिळवून टाकते.

एक गरीब माणूस, ऑटो रिक्षा चालवून घरासाठी कमाई करणारा जर आजारी पडला तर काय होतं. तो एकटाच आजारी पडत नाही, तर संपूर्ण घर आजारी होवून जाते. घराची सगळी व्यवस्था आजारी होते. आणि या गोष्टीचा आम्ही विचार करून आरोग्य क्षेत्रामध्ये एक खूप मोठी सर्वसमावेशक दृष्टिकोनातून योजना तयार केली. काही लोक याला मोदी केअरच्या रूपाने आज प्रचलित करीत आहेत. मुळात ही योजना आहे, ‘आयुष्मान भारत‘. आणि यामध्ये आम्ही संरक्षणात्मक आरोग्य सुविधा पुरवणार आहे. परवडणा-या दरामध्ये औषधोपचार देण्यात येणार आहेत. अशा प्रकारे एक शाश्वत साखळी तयार करण्यात येणार आहे. अशा अनेक गोष्टींचा विचार त्यामध्ये करून पुढे जात आहोत.

या योजनेचे दोन घटक आहेत. एक म्हणजे, आम्ही देशामध्ये जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त वेलनेस सेंटर तयार करणार आहोत. या केंद्रांमध्ये आजूबाजूच्या 12-15 गावांतल्या लोकांसाठी सर्व प्रकारची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देता येणार आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यामुळे मोठ्या रूग्णालयांशी संपर्क साधून आलेल्या रूग्णावर उपचारासाठी तातडीने मार्गदर्शन  घेता येणार आहे. तसेच आवश्यक त्या औषधांचा पुरवठा करता येणार आहे.

दुसरा भाग आहे तो म्हणजे संरक्षणात्मक आरोग्य सुविधेचा. यालाही आम्ही प्राधान्य देणार आहे. यामध्ये मग योग, जीवनशैली यांचाही विचार संरक्षणात्मक आरोग्य सेवेमध्ये केला जाणार आहे. यामध्ये पौष्टिक आहार मार्गदर्शनचा समावेश आहे. आम्ही एक पोषण मोहीम सुरू केली आहे. महिला आणि बालकांसाठी आरोग्य सेवा आहे, त्याव्दारे ही मोहीम चालवली जाते.

जगभरातल्या समृद्ध देशांमध्येही आजही मातृत्व रजेविषयी फारशी उदारता दाखवली जात नाही. मात्र आमच्या सरकारने तशी उदारता दाखवली आहे. गर्भवती, नवमाता आणि नवजात बालके यांच्या आरोग्याचा विचार करून, त्यांच्या आरोग्याची चिंता लक्षात घेवून, आमच्या सरकारने आता मातृत्वाची रजा 26 आठवडे केली आहे. मला माहीत आहे की, ही माहिती मिळाल्यानंतर यू. के. मधले लोक नक्कीच आनंदी होतील.

आणखी एक  बाजू आरोग्याविषयी आम्ही केली आहे. भारतामध्ये जवळपास दहा कोटी परिवार म्हणजे 50 कोटी जनता, याचाच अर्थ जवळपास निम्म्या लोकसंख्येला लाभ मिळू शकेल, अशी आरोग्य विमा योजना आम्ही तयार केली आहे. यामध्ये वर्षभरामध्ये पाच लाख रूपयांपर्यंत आजारपणाचा खर्च सरकार करणार आहे. एका वर्षभरात कुटुंबामधल्या कोणालाही, कितीही व्यक्तींना आजारपण आले, तर त्या कुटुंबाचा पाच लाखापर्यंतचा खर्च सरकारकडून करण्यात येणार आहे. या कारणामुळे आता गरीब व्यक्तीला आजारपणात औषधोपचार मिळू शकणार आहेत. आजारी पडलो तर काय करायचे, या भयापासून गरीबाची आम्ही मुक्तता केली आहे.

हे कार्य भगीरथाचे आहे, हे मला माहीत आहे. परंतु कोणी तरी ते करायलाच पाहिजे होते.

दुसरे म्हणजे जी खाजगी रूग्णालये येण्याची शक्यता आहे, त्यांचे देशातल्या दोन क्रमांकाच्या, तीन क्रमांकाच्या,  शहरांमध्ये चांगल्या रूग्णालयांची एक साखळी तयार होवू शकणार आहे. कारण त्यांना माहीत आहे की, आता रूग्ण येणार आहेत. आता रूग्णांचे पैसे कोणीतरी देणारा आहे, त्यामुळे खाजगी रूग्णालयांची संख्या वाढण्यास मदत मिळणार आहे.

एखाद्याला साधे आजारपण आले तर तो विचार करतो की, अरे, कशाला रूग्णालयामध्ये जायचे, असेच दोन दिवसांत आपण बरे होवू. असे म्हणून गरीब माणूस आजारपण अंगावर काढतो. परंतु आता गरीबाला तसे करण्याची अजिबात गरज नाही. रूग्णाला आणि रूग्णालयालाही माहीत आहे, की आपल्या औषधोपचाराचा खर्च मिळणार आहे. आणि त्यामुळेच रूग्णालयांची साखळी बनणार आहे.

आणि मला असं वाटतं की, आगामी काळामध्ये आपल्यापैकी ज्यांना कुणाला आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे, त्यांना एक हजारांपेक्षा जास्त चांगली रूग्णालये निर्माण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आणि ही संधी कायम अशीच असणार आहे.

अगदी याचप्रमाणे औषधांचे आहे. औषधांचे पॅकिंग चांगले असते. औषधे लिहून देत असल्याबद्दलही काही मिळत असते. आपल्याला माहीत असेलच की, डाक्टरांची परिषद कधी सिंगापूरला होते, कधी दुबईला होते. तिथं काही आजार पसरला आहे, म्हणून ही मंडळी जात नाहीत. तर औषध निर्माण करत असलेल्या कंपन्यांना त्यांना घेवून जाणे महत्वाचे वाटते.

यावर तोडगा म्हणून आम्ही काय केले ते सांगतो. जेनेरिक औषध विक्री सुरू केली. ही औषधे तितक्याच उत्तम दर्जाची असतात. जे औषध 100 रूपयांना बाहेर असते, तेच औषध जेनेरिक औषधांच्या दुकानामध्ये 15 रूपयांना मिळते. आम्ही देशभरामध्ये जवळपास 3 हजार जन-औषधालये सुरू केली आहेत. आणि आता ही संख्या वाढवण्यात येणार आहे. यामुळे सामान्य जनतेला त्याचा लाभ मिळू शकेल. या जन-औषधालयांचा प्रचारही आम्ही करीत आहोत.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Highlights: First 100 Days Of Modi 3.0, Ministers Unveil Report Card

Media Coverage

Highlights: First 100 Days Of Modi 3.0, Ministers Unveil Report Card
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Bharatiya Antariksh Station (BAS) Our own Space Station for Scientific research to be established with the launch of its first module in 2028
September 18, 2024
Cabinet approved Gaganyaan Follow-on Missions and building of Bharatiya Antariksh Station: Gaganyaan – Indian Human Spaceflight Programme revised to include building of first unit of BAS and related missions
Human space flight program to continue with more missions to space station and beyond

The union cabinet chaired by the Prime Minister Shri Narendra Modi has approved the building of first unit of the Bharatiya Antariksh Station by extending the scope of Gaganyaan program. Approval by the cabinet is given for development of first module of Bharatiya Antariksh Station (BAS-1) and undertake missions to demonstrate and validate various technologies for building and operating BAS. To revise the scope & funding of the Gaganyaan Programme to include new developments for BAS & precursor missions, and additional requirements to meet the ongoing Gaganyaan Programme.

Revision in Gaganyaan Programme to include the scope of development and precursor missions for BAS, and factoring one additional uncrewed mission and additional hardware requirement for the developments of ongoing Gaganyaan Programme. Now the human spaceflight program of technology development and demonstration is through eight missions to be completed by December 2028 by launching first unit of BAS-1.

The Gaganyaan Programme approved in December 2018 envisages undertaking the human spaceflight to Low Earth Orbit (LEO) and to lay the foundation of technologies needed for an Indian human space exploration programme in the long run. The vision for space in the Amrit kaal envisages including other things, creation of an operational Bharatiya Antariksh Station by 2035 and Indian Crewed Lunar Mission by 2040. All leading space faring nations are making considerable efforts & investments to develop & operationalize capabilities that are required for long duration human space missions and further exploration to Moon and beyond.

Gaganyaan Programme will be a national effort led by ISRO in collaboration with Industry, Academia and other National agencies as stake holders. The programme will be implemented through the established project management mechanism within ISRO. The target is to develop and demonstrate critical technologies for long duration human space missions. To achieve this goal, ISRO will undertake four missions under ongoing Gaganyaan Programme by 2026 and development of first module of BAS & four missions for demonstration & validation of various technologies for BAS by December, 2028.

The nation will acquire essential technological capabilities for human space missions to Low Earth Orbit. A national space-based facility such as the Bharatiya Antariksh Station will boost microgravity based scientific research & technology development activities. This will lead to technological spin-offs and encourage innovations in key areas of research and development. Enhanced industrial participation and economic activity in human space programme will result in increased employment generation, especially in niche high technology areas in space and allied sectors.

With a net additional funding of ₹11170 Crore in the already approved programme, the total funding for Gaganyaan Programme with the revised scope has been enhanced to ₹20193 Crore.

This programme will provide a unique opportunity, especially for the youth of the country to take up careers in the field of science and technology as well as pursue opportunities in microgravity based scientific research & technology development activities. The resulting innovations and technological spin-offs will be benefitting the society at large.