कॅबिनेट सचिव आणि इतर विभागीय सचिवांनी आज माध्यमांना प्रगती यंत्रणेच्या (प्रो- ऍक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन- सक्रिय सुशासन आणि वेळेवर अंमलबजावणी.) फलनिष्पत्तीबाबत माहिती दिली. ही यंत्रणा पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे.

प्रगती यंत्रणेअंतर्गत असलेल्या प्रकल्पांविषयी आणि समस्या टप्प्याटप्प्याने सोडवण्याच्या प्रणालीबद्दल कॅबिनेट सचिवांनी यावेळी माहिती दिली. या यंत्रणेच्या मदतीने विविध स्तरांवर आणि राज्य सरकारांमध्ये समस्यांचे नियोजनबद्ध निरीक्षण करुन त्या सोडवता येतात.

सुरुवातीला प्रश्न मंत्रालयाच्या स्तरावर सोडवले जातात. मात्र गुंतागुंतीचे आणि महत्त्वाचे प्रश्न ठराविक संस्थात्मक यंत्रणेद्वारे उच्चस्तरीय पुनरावलोकनासाठी पाठवले जातात आणि शेवटी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या प्रगती बैठकीत त्यांचा निपटारा केला जातो, असे त्यांनी सांगितले.

या टप्प्याटप्प्याने प्रश्न सोडवण्याच्या यंत्रणेमुळे मंत्रालयांमध्ये समन्वय साधला जातो. वेळेवर निर्णय घेता येतात आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पांतील अंमलबजावणीतील अडथळे दूर करण्यावर लक्ष केंद्रित करता येते, असे कॅबिनेट सचिवांनी सांगितले.  प्रगती  ही यंत्रणा जबाबदारी निश्चित करण्यासाठी आणि प्रकल्पांची अंमलबजावणी वेगवान करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ म्हणून कार्यरत आहे. उच्चस्तरीय निरीक्षण आणि पुनरावलोकनामुळे ही प्रक्रिया अधिक परिणामकारक ठरते.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
In 2019, India launched its first Vande Bharat Express; seven years later came the sleeper version, and Railways now plans 260 Vande sleeper rakes with world-class features

Media Coverage

In 2019, India launched its first Vande Bharat Express; seven years later came the sleeper version, and Railways now plans 260 Vande sleeper rakes with world-class features
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 3 सप्टेंबर 2026
September 03, 2026

A- Rating to Third-Largest Wind Producer: How Modi’s Policies Are Rewriting India’s Global Rank