Dialogue is the only way to cut through deep rooted religious stereotypes and prejudices: PM Modi
Man must relate to nature, man must revere nature, not merely consider it a resource to be exploited: PM

"संवाद - ग्लोबल इनिशिएनटीव्ह ऑन काँफ्लिट अव्हॉइडन्स ऍण्ड एन्व्हायरमेन्ट कंसेन्सस " चे दुसरे पर्व आज आणि उद्या यांगून इथे आयोजित करण्यात आले आहे.

या वैशिष्ट्यपूर्ण परिषदेची पहिली बैठक, सप्टेंबर 2015 मध्ये विवेकानंद केंद्राने, नवी दिल्लीत आयोजित केली होती. विविध धर्म आणि परंपरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या परिषदेला, पंतप्रधानांनी संबोधित केले होते. संवादच्या दुसऱ्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संदेश दिला.जगभरातल्या समाजाला, संघर्ष कसा टाळावा हवामान बदलासारख्या जागतिक आव्हानाला कसे सामोरे जावे शांतता आणि सलोख्यासह सुरक्षित आयुष्य कसे घालवावे यासारखे प्रश्न भेडसावत आहेत.

विविध धर्म आणि संस्कृती तसेच अध्यात्माच्या अनेक शाखांत ज्याची मूळे खोलवर रुजली आहेत अशा, मानवतेच्या वैचारिक दीर्घ परंपरांच्या आधाराने या प्रश्नांचा शोध  घेणे नैसर्गिक ठरेल.

कठीण मुद्द्यांबाबत संवादावर ठाम विश्वास असणाऱ्या प्राचीन भारतीय परंपरेचे आपण पाईक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. संघर्ष टाळण्यासाठी आणि विचारांची देवाण घेवाण करण्यासाठीची, 'तर्क शास्त्र' ही प्राचीन भारतीय संकल्पना, संवाद आणि चर्चेवर आधारित आहे.

भारतीय पुराणातले, भगवान राम, श्रीकृष्ण, भगवान बुद्ध, भक्त प्रल्हाद यांचा दाखला देतानाच,या सर्वांच्या कृतीचा उद्देश धर्माचा सांभाळ करण्याचे होते असे पंतप्रधान म्हणाले.

जगातल्या समुदायांमध्ये दुही निर्माण करून, राष्ट्राराष्ट्रामध्ये आणि समाजामध्ये संघर्षाची बीजे पेरणाऱ्या, धार्मिक रूढी आणि पूर्वग्रहांचे उच्चाटन करण्यासाठी  संवाद किंवा चर्चा  हाच एकमेव मार्ग असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

मानवाने निसर्गाची जोपासना केली नाही तर, हवामान बदलाच्या रूपाने निसर्ग त्यावर व्यक्त होतो.

आधुनिक समाजासाठी पर्यावरणविषयक कायदे आणि नियमावली आवश्यक असल्याचे सांगतानाच  सामंजस्यपूर्ण पर्यावरणविषयक प्रतिसादात्मक जाणिवेची गरज त्यांनी व्यक्त केली.

केवळ शोषण करून घेण्याचे एक संसाधन  म्हणून निसर्गाकडे न पाहता, मानवाने निसर्गाशी तादात्म्य पावले पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे.

21 व्या शतकातले जग, परस्परांवर अवलंबून असून, दहशतवादापासून ते हवामान बदलापर्यंत अनेक  जागतिक आव्हाने या जगासमोर ठाकली असताना, आशियातल्या प्राचीन संवादाच्या परंपरेद्वारे त्यावर तोडगा मिळेल असा मला विश्वास आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PLI schemes attract ₹2 lakh crore investment till September, lift output and jobs across sectors

Media Coverage

PLI schemes attract ₹2 lakh crore investment till September, lift output and jobs across sectors
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 डिसेंबर 2025
December 13, 2025

PM Modi Citizens Celebrate India Rising: PM Modi's Leadership in Attracting Investments and Ensuring Security