पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 3 मार्च, 2019 रोजी उत्तर प्रदेशातील अमेठीला भेट देणार आहेत. 
 
पंतप्रधान अमेठीमधील कौहर येथे इंडो-रशिया रायफल प्रायव्हेट  लिमिटेड राष्ट्राला सर्पित करणार आहेत. 
 
इंडो-रशिया रायफल प्रायव्हेट  लिमिटेड हा भारताच्या आयुध कारखाना आणि रशियन कंपनीचा संयुक्त उपक्रम असून भारत- रशिया सहकार्यातील मैलाचा दगड आहे. 
 
कोरवा आयुध कारखान्यात प्रसिद्ध कलशनिकोव्ह रायफल्सच्या अत्याधुनिक  श्रेणीतील रायफल्सची निर्मिती केली जाणार आहे.
हा संयुक्त उपक्रम मेक इन इंडियाचे झगमगते उदाहरण आहे , जो देशातील सशस्त्र दलाची मदत करेल आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करेल. या कारखान्यामुळे अमेठी 
आणि आसपासच्या परिसरात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. हा संयुक्त उपक्रम उत्तर प्रदेश संरक्षण कॉरिडॉर प्रकल्पाला मोठी चालना देईल. 
पंतप्रधान  अनेक विकास प्रकल्पांचे देखील उदघाटन करणार आहेत. हे प्रकल्प वीज निर्मिती , आरोग्य आणि उत्पादन क्षेत्राशी निगडित आहेत. अमेठी आणि उत्तर प्रदेशला या प्रकल्पांचा थेट लाभ मिळेल. 
 
पंतप्रधान कौहर येथे एका जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Water conservation in India: The community as custodian

Media Coverage

Water conservation in India: The community as custodian
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 मार्च 2026
March 21, 2026

Empowering Bharat Holistically: Health, Finance, Heritage & Export Growth Under the Leadership of PM Modi