पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मुख्यालय इमारतीचे उद्घाटन होणार आहे. नवी दिल्लीत टिळक मार्ग येथे ही इमारत बांधण्यात आली आहे.
या इमारतीत अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. यात ऊर्जा कार्यक्षम वीजव्यवस्था आणि रेनवॉटर हार्वेस्टींग यांचाही समावेश आहे. या मुख्यालयात केंद्रीय पुरातत्व विषयक वाचनालय असेल ज्यात १५ लाखांहून अधिक पुस्तके आणि मासिकांचा समावेश आहे.





