राजस्थानमधल्या बारमेर जिल्हयामध्ये पाचप्रदा येथे उभारण्यात आलेल्या राजस्थान तेलशुध्दीकरण प्रकल्पाचा प्रारंभ उद्या दि. 16 जानेवारी 2018 रोजी होत आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून ते जनतेला संबोधित करतील.

राजस्थानात तेल आणि वायूचे लक्षणीय साठे आहेत. “राजस्थान तेलशुध्दीकरण प्रकल्प” हा राज्यातला पहिलाच प्रकल्प आहे. या कारखान्यामार्फत 9 एमएमटीपीए तेल शुध्दीकरण पेट्रोकेमिकल्स कॉम्फ्लेक्सचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या तेलशुध्दीकरण प्रकल्पामध्ये अत्याधुनिक यंत्रणा वापरण्यात येत असून पर्यावरण संरक्षणासाठी “बीएस-व्हीआय.” अंतर्गत उत्सर्जन नियमांचे पालन करण्यात येणार आहे. एचपीसीएल आणि राजस्थान सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पासाठी अंदाजे 43 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

प्रकल्प प्रारंभ कार्यक्रमाला राजस्थानचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच विविध केंद्रीय मंत्री उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Vikas Bhi, Virasat Bhi: How JATAN, AI and Digital Archives are revolutionising India’s cultural heritage preservation

Media Coverage

Vikas Bhi, Virasat Bhi: How JATAN, AI and Digital Archives are revolutionising India’s cultural heritage preservation
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
भारत छोडो आंदोलनात सहभागी शूर स्वातंत्र्यसैनिकांना पंतप्रधानांकडून आदरांजली
August 09, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक 'भारत छोडो' आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचे स्मरण करत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या धैर्य आणि दृढ निश्चयाला आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या 'भारत छोडो' आंदोलनाच्या हाकेने स्वातंत्र्यलढ्यात नवचैतन्य फुंकले आणि ब्रिटिश राजवटीतून मुक्त होण्याच्या भारतातील जनतेच्या अढळ संकल्पाचे दर्शन घडवले, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्स (X) वर पोस्ट केले:

"ऐतिहासिक 'भारत छोडो' आंदोलनातील सर्व सहभागींचे भावपूर्ण स्मरण. त्यांचे धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणादायी राहील. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन दिलेला 'भारत छोडो'चा एल्गार आपल्या स्वातंत्र्यलढ्यात नवीन ऊर्जा भरून गेला आणि वसाहतवादी शासनातून मुक्त होण्याच्या आपल्या लोकांच्या अढळ निश्चयाचे त्याने प्रतीक बनले."