शेअर करा
 
Comments
Shri Venkaiah Naidu has long experience, and is well-versed in the intricacies of Parliamentary procedures: PM
Shri Naidu is always sensitive to the requirements of the rural areas, the poor and the farmers: PM Modi

राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांच्या स्वागतप्रसंगी राज्यसभेच्या सदस्यांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले.

स्वागतपर भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान म्हणाले की, आजच्या 11 ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य चळवळीतील तरुण क्रांतिकारक खुदीराम बोस यांना ब्रिटीशांनी फासावर चढवले. ते म्हणाले की, ही घटना स्वातंत्र्यासाठी लढलेल्यांच्या बलिदानाचे तसेच आपणा सर्वांवरच्या जबाबदारीचे स्मरण करुन देते. वेंकय्या नायडू हे स्वतंत्र भारतात जन्मलेले पहिले उपराष्ट्रपती आहेत असे पंतप्रधान म्हणाले. नायडू यांना प्रदीर्घ अनुभव असून संसदीय कामकाजाच्या गुंतागुंतीची त्यांना उत्तम जाण आहे असे ते म्हणाले.

वेंकय्या नायडू यांच्याबरोबरच्या प्रदीर्घ अनुबंधाचे स्मरण करताना पंतप्रधान म्हणाले की, ग्रामीण भाग, गरीब आणि शेतकरी यांच्या गरजांप्रति नायडू हे नेहमीच संवदेनशील असतात आणि त्यांच्या समस्यांबाबत नायडू यांनी दिलेली माहिती अतिशय उपयुक्त असते.

विनयशील आणि ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती आज देशाच्या सर्वोच्च पदांवर विराजमान असून यातून भारतीय लोकशाहीची परिपक्वता आणि भारतीय संविधानाचे सामर्थ्य दिसून येते असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांचे वक्तव्य खालीलप्रमाणे आहे:

आदरणीय सभापती, राज्यसभा सदनातर्फे तसेच, देशवासियांकडून आपले खूप खूप अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा.
11 ऑगस्ट, देशाच्या इतिहासातल्या महत्वाच्या तारखेशी जोडली गेलेली तारीख आहे. आजच्याच दिवशी 18 वर्षाच्या कोवळ्या वयात खुदिराम बोस यांना फासावर चढवण्यात आले.स्वातंत्र्यासाठी कसा संघर्ष झाला, किती जणांनी बलिदान दिले आणि या सर्व घटना पाहता आपणा सर्वांची जबाबदारी किती मोठी आहे याचे स्मरण, ही घटना करून देते.
आदरणीय व्यंकय्या नायडू हे देशाचे असे पहिले उपराष्ट्रपती आहेत ज्यांचा जन्म स्वतंत्र भारतात झाला आहे, ही बाब आपणा सर्वांच्या ध्यानात नक्कीच आली असेल.
आदरणीय व्यंकय्या नायडू असे पहिले उपराष्ट्रपती आहेत, मला वाटते कदाचित ते एकटे उपराष्ट्रपती आहेत जे अनेक वर्षे याच परिसरात, याच वातावरणात वाढले आहेत, कदाचित देशाला असे पहिले उपराष्ट्रपती लाभले आहेत जे या सदनाच्या प्रत्येक बाबीशी परिचित आहेत. सदस्यापासून समितीपर्यंत,समिती ते सदनाच्या कार्यवाही पर्यंत स्वतः या प्रक्रियेतून गेलेले पहिले उप राष्ट्रपती देशाला प्राप्त झाले आहेत.
ते सार्वजनिक जीवनात जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून आले. जयप्रकाश नारायण यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, सुशासनासाठी जे राष्ट्रव्यापी आंदोलन झाले, त्यात विद्यार्थीदशेत,आन्धप्रदेश मधून एक विद्यार्थी नेता म्हणून त्यांनी स्वतःला झोकून दिले. तेव्हापासून विधानसभा असो, राज्यसभा असो, त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचाही विकास केला आणि कार्यक्षेत्राचाही विस्तार केला.त्यामुळेच आज आपण सर्वानी त्यांची निवड करून या पदासाठी गौरवपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे सुपूर्द केली.
व्यंकय्याजी शेतकऱ्याचे पुत्र आहेत.त्यांच्यासमवेत अनेक वर्षे काम करण्याचे सौभाग्य मला लाभले.गाव असो, गरीब असो, शेतकरी असो, या विषयांवर बारकाईने अभ्यास करत प्रत्येक वेळी ते आपल्याकडची माहिती देत राहिले.केंद्रीय मंत्रिमंडळातही ते नागरी विकास मंत्री होते. मात्र मला नेहमी वाटत असे की मंत्रिमंडळात चर्चेदरम्यान ते शहर या विषयावर बोलत असत त्यापेक्षा जास्त रुचीने ते ग्रामीण आणि शेतकरी या विषयावर चर्चा करत असत. हा विषय त्यांना मनापासून जवळचा होता,लहानपणापासूनची कौटुंबिक पार्श्वभूमी त्याला कारणीभूत असावी.
व्यंकय्याजी उपराष्ट्रपतीपदावर विराजमान झाले, त्याचे औचित्य साधून साऱ्या जगाला एका गोष्टीची माहिती करून द्यायला हवी, मला असे वाटते की आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे. भारताची लोकशाही किती प्रगल्भ आहे याची माहिती देण्याची आपली जबाबदारी आहे .भारताच्या संविधानाची किती मोठी ताकद आहे. आपल्या ज्या थोर पुरुषांनी संविधान दिले, त्या संविधानाचे सामर्थ्य असे आहे की हिंदुस्तानच्या संविधानिक पदावर असे लोक विराजमान आहेत, ज्यांची पार्श्वभूमी गरिबीची आहे,गावातून आले आहेत, सर्वसामान्य कुटुंबातून आले आहेत,ज्यांची पिढीजात श्रीमंती नाही. देशाच्या सर्व संविधानिक पदावर या पार्श्वभूमीतल्या व्यक्ती असणे, भारताच्या लोकशाहीच्या प्रगल्भतेचे दर्शन घडवते आणि हिंदुस्तानच्या सव्वाशे कोटी देशवासियांना याचा अभिमान आहे. संविधानाच्या निर्मात्यांना मी पुन्हा एकदा नमन करतो.
व्यंकय्याजी यांच्याकडे व्यक्तित्व,कृतित्व आणि वक्तृत्वही आहे.ते भाषण करतात तेव्हा कधीकधी वाटते,जेव्हा तेलगूमधून करतात तेव्हा वाटते वेगाने गाडी चालली आहे.मात्र हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा विचारात स्पष्टता आहे,प्रेक्षकांशी एकरूपता आहे. हा शब्दांचा खेळ नाही,वक्तृत्वाच्या जगात वावरणाऱ्या लोकांना हे माहित आहे की केवळ शब्दांचे खेळ केले तर त्या भावना कोणाच्या मनापर्यंत पोहोचत नाहीत.मात्र विचारधारेवर ठाम विश्वासाने आपला दृष्टिकोन आणि दृढनिश्चयाने जेव्हा शब्द येतात तेव्हा ते आपोआपच जनतेच्या मनाला स्पर्शून जातात.व्यंकय्याजी यांच्याबाबतीत असे घडले आहे, दिसले आहे.
हे सत्य आहे के ग्रामीण विकासात असे कोणतेच खासदार नाहीत जे सरकारकडे या विषयाबाबत आग्रह धरत नाहीत. सरकार कोणाचेही असू दे, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालचे सरकार असू दे, किंवा माझ्या नेतृत्वाखालचे सरकार असू दे, खासदारांची एक मागणी सातत्याने असते आणि ती आपल्या क्षेत्रात प्रधान मंत्री ग्राम सडक कार्यासाठी. आपल्या सर्व संसद सदस्यांसाठी अभिमानाची बाब आहे की देशाला प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची कल्पना, त्याची योजना याची भेट कोणी दिली असेल तर ती आपल्या उपराष्ट्रपतींनी दिली, आदरणीय व्यंकय्याजी यांनी दिली. अशा गोष्टी तेव्हाच घडत जेव्हा गावाप्रती, शेतकऱ्यांप्रती, दलितांप्रती, पीडित, शोषितांप्रती आपुलकी असते,त्यांना कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याचा संकल्प असतो.
आज उपराष्ट्रपती या नात्याने व्यंकय्याजी आपल्यासोबत आहेत, या सदनात, आपल्या सगळ्यांना काही क्षणासाठी जरा अवघड वाटेल, कारण वकिलांमध्ये, बारमधील एखादा वकील न्यायाधीश झाला तर सुरवातीला, न्यायालयात त्यांच्या समवेत बार सदस्य संवाद साधतात तेव्हा सुरवातीला एक अवघडलेपण येते, अरे कालपर्यंत तर ही व्यक्ती माझ्यासोबत उभी होती, माझ्याबरोबर वाद-विवाद करत होती,आज मी आता कसा संवाद साधावा, त्याचप्रमाणे काही क्षणासाठी आम्हा सर्वांनाच, विशेषकरून या सदनाच्या सदस्यांना,ज्यांनी इतकी वर्षे त्यांच्यासमवेत मित्र या नात्याने काम केले आणि आज ते या पदावर विराजमान आहेत. आपल्या लोकशाहीचे हे वैशिष्ट्य आहे की व्यवस्थेनुसार, त्याला अनुकूल अशी आपण आपली कार्यशैलीही बनवतो.
मला पूर्ण विश्वास आहे की आपल्यात दीर्घ काळासाठी राज्यसभा सदस्य म्हणून काम करून, सर्व खाचा-खोचा जाणून, परिपक्व झालेली व्यक्ती उपराष्ट्रपती आणि या सभागृहाचे सभापती म्हणून आपल्याला मार्गदर्शन करतील, दिशा देतील तेव्हा या पदाची प्रतिष्ठा अधिक वाढवण्यात त्यांचे मोठे योगदान राहील.मला पूर्ण विश्वास आहे, एका मोठ्या बदलाचे संकेत मला दिसत आहेत. ते चांगल्यासाठीच असतील.व्यंकय्याजी या प्रतिष्ठेच्या पदावर विराजमान झाले आहेत तेव्हा मी या बाबीचे स्मरण करू इच्छितो,
‘अमल करो ऐसा अमन मैं
अमल करो ऐसा अमन मैं
जहाँ से गुजरी तुम्हारी नजरे
उधार सें तुम्हे सलाम आए
त्याच धर्तीवर मी म्हणेन
अमल करो ऐसा सदन मैं
जहाँ से गुजरी तुम्हारी नजरे
उधार सें तुम्हे सलाम आए
खूप-खूप शुभेच्छा. अनेक अनेक धन्यवाद.

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
परीक्षा पे चर्चा 2022' साठी पंतप्रधानांचे सहभागी होण्याचे आवाहन
Explore More
उत्तरप्रदेशात वाराणसी इथे काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

लोकप्रिय भाषण

उत्तरप्रदेशात वाराणसी इथे काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
Corporate tax cuts do boost investments

Media Coverage

Corporate tax cuts do boost investments
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 25 जानेवारी 2022
January 25, 2022
शेअर करा
 
Comments

Economic reforms under the leadership of PM Modi bear fruit as a study shows corporate tax cuts implemented in September 2019 resulted in an economically meaningful increase in investments.

India appreciates the government initiatives and shows trust in the process.