शेअर करा
 
Comments
At BRICS meet on G20 Summit sidelines, PM Modi focusses on trade, sustainable development and terrorism
Terrorism is the biggest threat to humankind: PM Modi at BRICS meet

महामहीम,

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष बोल्सनारो यांचे मी सर्वप्रथम स्वागत करतो. ब्रिक्स परिवारातही मी त्यांचे स्वागत करतो. या बैठकीचे आयोजन केल्याबद्दल मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. आमचे स्नेही रामाफोसा यांची दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.

महामहीम,

अशा प्रकारच्या अनौपचारिक विचार-विनिमयामुळे जी-20 च्या मुख्य विषयांवर परस्परांसमवेत समन्वयाची संधी मिळते. तीन प्रमुख आव्हानांकडे मी लक्ष वेधु इच्छितो. पहिले आव्हान म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेतली मंदी आणि अनिश्चितता, नियमाधारित बहुपक्षीय आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवस्थेवर एकतर्फी निर्णय आणि प्रतिस्पर्धा मोठ्या प्रमाणात आहे. दुसरीकडे उदयोन्मुख बाजारपेठ अर्थव्यवस्थांमधे पायाभूत गुंतवणुकीत सुमारे 1.3 ट्रिलियन डॉलरची कमतरता आहे, यातूनच संसाधनांची टंचाई स्पष्ट होत आहे.

दुसरे मोठे आव्हान आहे ते म्हणजे विकास आणि प्रगती समावेशक आणि निरंतर राखणे, हवामान बदलासारखे मुद्दे केवळ आपल्याच नव्हे तर भावी पिढीसाठीही चिंतेचा विषय आहेत, असमानता दूर करणारा आणि सबलीकरणात योगदान देणारा विकास हाच सर्वार्थाने विकास होय. दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे. निर्दोष व्यक्तींचे बळी घेण्याबरोबरच दहशतवादामुळे, आर्थिक प्रगती आणि सामाजिक स्थैर्यावरही मोठा वाईट परिणाम होतो. दहशतवाद आणि जातीवादाचे समर्थन आणि सहाय्याचे सर्व मार्ग आपण बंद केले पाहिजेत.महामहीम,

या समस्यांचे निराकरण सोपे नाही, तरीही मी पाच प्रमुख सूचना देऊ इच्छितो.

ब्रिक्स राष्ट्रांमधल्या संवादामुळे एकतर्फी निर्णयांचे दुष्परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतात. सुधारणा आणि बहुत्मता यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय आणि व्यापारी संस्था आणि संघटनांमधे आवश्यक सुधारणांवर आपण भर दिला पाहिजे.

सातत्यपूर्ण आर्थिक विकासासाठी तेल आणि गॅस यासारखी उर्जेची आवश्यक संसाधने सातत्याने वाजवी दरात उपलब्ध राहीली पाहिजेत.

न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून, सदस्य राष्ट्रांचे भौतिक आणि सामाजिक पायाभूत संरचना, नवीकरणीय उर्जा कार्यक्रमातली गुंतवणूक यांना अधिक प्राधान्य मिळायला हवे. आपत्तीतही टिकाव धरणाऱ्या पायाभूत सुविधाकरिता आघाडीसाठी भारताने घेतलेला पुढाकार, अल्पविकसित आणि विकसनशील देशांना, नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी योग्य पायाभूत सुविधा निर्मितीसाठी सहाय्यक ठरेल. यामधे सहभागी होण्याचे मी आपल्याला आवाहन करतो.

जगभरात कुशल कारागिरांची ये-जा सुलभ राहीली पाहिजे. ज्या देशात मोठ्या प्रमाणात वृद्धांची संख्या आहे अशा देशांनाही त्याचा लाभ होईल.

दहशतवादावर एका जागतिक परिषदेत मी नुकतेच आवाहन केले आहे. दहशतवादाविरोधातल्या लढ्यासाठी आवश्यक त्या सहमतीचा अभाव आपल्याला निष्क्रिय ठेवू शकत नाही.

महामहीम,

ब्राझीलियामधे ब्रिक्स शिखर परिषदेची मी उत्सुकतेने प्रतिक्षा करत आहे. ही शिखर परिषद यशस्वी ठरावी यासाठी भारत संपूर्ण सहकार्य करेल.

आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद.

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
जम्मू काश्मीरच्या नौशेरा जिल्ह्यात भारतीय सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी सैनिकांसोबत साधलेला संवाद

लोकप्रिय भाषण

जम्मू काश्मीरच्या नौशेरा जिल्ह्यात भारतीय सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी सैनिकांसोबत साधलेला संवाद
Indian economy shows strong signs of recovery, upswing in 19 of 22 eco indicators

Media Coverage

Indian economy shows strong signs of recovery, upswing in 19 of 22 eco indicators
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Social Media Corner 7th December 2021
December 07, 2021
शेअर करा
 
Comments

India appreciates Modi Govt’s push towards green growth.

People of India show immense trust in the Govt. as the economic reforms bear fruits.