पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या कानपूरला भेट दिली. लखनौ मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधानांनी उद्‌घाटन केले आणि आग्रा मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजनही केले. पनकी औष्णिक ऊर्जा सयंत्राची त्यांनी पायाभरणी केली तसेच कानपूरमधल्या निरालानगर येथे फलकाचे विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन केले.

कानपूर ही देशासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या अनेक शुरांची जन्मभूमी आहे. आज उद्‌घाटन करण्यात आलेल्या प्रकल्पामुळे कानपूर आणि उत्तर प्रदेशच्या जनतेच्या जीवनात परिवर्तन घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

कानपूरमध्ये वीजपुरवठा सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने परिश्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी पनकी औष्णिक ऊर्जा सयंत्रणाचा उल्लेख केला आणि यामुळे कानपूर आणि उत्तर प्रदेशातला ऊर्जेच्या तुटवड्याची स्थिती कशी बदलेल याचा उल्लेख केला. सौभाग्य योजनेअंतर्गत 75 लाखाहून अधिक मोफत वीज जोडण्या उत्तर प्रदेशात देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या उपाययोजनांची त्यांनी माहिती दिली. गंगा नदी स्वच्छ करणे हे याआधी अशक्य मानले जात होते मात्र आपल्या सरकारने अशक्य ते शक्य केल्याचे ते म्हणा8ले. नदीत येणारे गटारांचे पाणी थांबविण्यासाठी आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्याचे ते म्हणाले.

उत्तर प्रदेशात येणारा संरक्षण कॉरीगॅट कानपूरच्या जनतेसाठी खूपच लाभदायी ठरेल. रस्ते, विमान, रेल्वेमार्गासह महत्वाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. विविध मेट्रो प्रकल्पही सुरू करण्यात आले आहेत. या प्रकल्पांमुळे उत्तर प्रदेशचा कायापालट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

2022 पर्यंत देशातल्या प्रत्येक कुटुंबाकडे घर असेल याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत देशात 1.5 कोटी घरे बांधण्यात आली आहेत.

बडगाम विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत आणि पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या कानपूरच्या शूर सैनिकांप्रती त्यांनी आदरांजली अर्पण केली. केंद्र सरकार दहशतवादाविरोधात ठोस कृती करत आहे असे पंतप्रधान म्हणाले.

देशात ऐक्याचे वातावरण राखणे महत्त्वाचे आहे. उत्तर प्रदेशात काश्मीरींवर हल्ला करणाऱ्यांवर उत्तर प्रदेश सरकारने तात्काळ कारवाई केल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. अशी कृत्ये करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी सर्व राज्य सरकारांना केले.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Operation Sindoor and beyond: How India prepared for future wars in 2025

Media Coverage

Operation Sindoor and beyond: How India prepared for future wars in 2025
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 29 डिसेंबर 2025
December 29, 2025

From Culture to Commerce: Appreciation for PM Modi’s Vision for a Globally Competitive India